नाट्यपंढरी वाचनकट्ट्यावर कलाविष्काराची वर्षपूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:20 IST2021-06-01T04:20:06+5:302021-06-01T04:20:06+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोनाने रंगमंचावरील कला सादरीकरणाची वाट बंद केल्यानंतर सोशल मीडियाच्या मंचावरून कलेचे अवकाश मोकळे करीत ...

Anniversary of Natyapandhari Vachankatta | नाट्यपंढरी वाचनकट्ट्यावर कलाविष्काराची वर्षपूर्ती

नाट्यपंढरी वाचनकट्ट्यावर कलाविष्काराची वर्षपूर्ती

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : कोरोनाने रंगमंचावरील कला सादरीकरणाची वाट बंद केल्यानंतर सोशल मीडियाच्या मंचावरून कलेचे अवकाश मोकळे करीत सांगलीच्या कलाकारांनी रसिकांशी असलेले नाते आणखी घट्ट विणले. केवळ काही दिवस नव्हे, तर तब्बल एक वर्ष त्यांनी हा ऑनलाईन रंगमंच गाजविला.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सांगली शाखेच्यावतीने ‘नाट्यपंढरी वाचनकट्टा’ हा आगळा उपक्रम राबविण्यात आला. मागील वर्षी लॉकडाऊनमुळे शंभरावे ऐतिहासिक नाट्य संमेलनही पुढे ढकलण्यात आले. नाट्य परिषदेच्या सांगली शाखेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत या अनुषंगाने एखादा उपक्रम राबविण्याविषयी चर्चा झाली. त्या काळात कोणत्याही जाहीर सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी आल्याने चर्चेतून ‘नाट्यपंढरी वाचन कट्टा’ उपक्रमावर शिक्कामोर्तब झाले. त्यासाठी सोशल मीडियाचा वापर करून सहभागी वाचकांचे व्हिडिओ संकलित करून ते नाट्य परिषदेच्या यूट्युब चॅनेलवर अपलोड करून ते सर्वांच्यापर्यंत पोहोचवण्यास सुुरुवात झाली.

१ जून २०२० पासून या उपक्रमाला सुरुवात झाली. त्यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होते. त्यामुळे त्यांच्याच ‘फकिरा’ या कांदबरीचे क्रमशः वाचन करून हा उपक्रम सुरू झाला. सांगली आणि परिसरातील वेगवेगळ्या कलाकारांनी या कादंबरीचे वाचन केले आणि या उपक्रमाची चांगली सुरुवात झाली. त्यानंतर वेळोवेळी दिनविशेष, व्यक्तिविशेष, निरनिराळे विषय घेऊन हा वाचनकट्टा आपली वाटचाल करीत राहिला. वाचनकट्टा हे माध्यम अनेकांना आनंद देऊ लागले. सुरुवातीला १०० दिवस हा उपक्रम राबवायचा, असे ठरले होते, पण नंतर मिळणारा उदंड प्रतिसाद पाहून वर्षभर म्हणजे ३६५ दिवस हा उपक्रम राबवला गेला. सोमवारी या उपक्रमाची सांगता झाली.

संगीत, नृत्य, नाट्य, काव्यवाचन, कथाकथन, कथावाचन, लोककला, बालसाहित्य, निवेदन, प्रवास वर्णन, कादंबरी वाचन अशा अनेक प्रकारांत सांगली परिसरातील कलाकारांबरोबरच महाराष्ट्रातील अनेक गावांतून, तसेच बेळगाव, बेंगलोर, बनारस आणि अमेरिकेतूनही काही कलाकारांचा सहभाग या वाचनकट्ट्यावर होता. नाट्य परिषदेच्या ८६ सभासदांनी या वाचनकट्ट्यावर आपलं सादरीकरण केलं.

नाट्य परिषदेचे मुकुंद पटवर्धन, सनित कुलकर्णी, भालचंद्र चितळे, नाट्य कलाकार यशोधन गडकरी, मानसी कुलकर्णी यांनी उपक्रमात महत्त्वपूर्ण योगदान दिले. व्हिडिओ एडिटिंगचे काम स्वप्निल कोल्हे, राजा पंडित, अवधूत गोगटे यांनी केले.

Web Title: Anniversary of Natyapandhari Vachankatta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.