आत्मशक्ती पतसंस्थेच्या मांगले शाखेचा वर्धापनदिन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:26 IST2021-03-31T04:26:21+5:302021-03-31T04:26:21+5:30
मांगले शाखेत संस्थापक हणमंतराव पाटील यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले. यावेळी हंबीरराव पाटील, संजय पाटील, मीना बेंद्रे, अनिल फल्ले ...

आत्मशक्ती पतसंस्थेच्या मांगले शाखेचा वर्धापनदिन उत्साहात
मांगले शाखेत संस्थापक हणमंतराव पाटील यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले. यावेळी हंबीरराव पाटील, संजय पाटील, मीना बेंद्रे, अनिल फल्ले उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
पेठ : आत्मशक्ती ग्रामीण बिगरशेती सहकारी संस्थेच्या मांगले शाखेचा १८ वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. यावेळी मांगले गावच्या सरपंच मीना प्रकाश बेंद्रे आणि धनटेक पाणी पुरवठा संस्थेचे अध्यक्ष जयवंत पाटील, मांगले विकास सोसायटीचे अध्यक्ष संपत चरापले यांच्या प्रमुख उपस्थितीत संस्थेचे संस्थापक हणमंतराव पाटील यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले. यावेळी सत्यनारायण पूजा करण्यात आली.
संस्थेचे अध्यक्ष हंबीरराव पाटील, उपाध्यक्ष अंबादास पेठकर, शेखर बोडरे, पोपट चरापले, अजित गेवारी, सुरेश पाटील, डॉ उत्तम बन्ने, डॉ. ओमकार पाटील, विजय गराडे, अब्बास शेख, सुधाकर पाटील, तसेच सर्व संचालक, कर्मचारी, सभासद, ठेवीदार उपस्थित होते.
स्वागत जनरल मॅनेजर संजय दाभाेळे यांनी केले. शाखा अधिकारी अनिल फल्ले यांनी आभार मानले.