अण्णासाहेब लठ्ठे यांना जयंतीदिनी अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:40 IST2020-12-13T04:40:38+5:302020-12-13T04:40:38+5:30

१२ लठ्ठे कॉलेज लठ्ठे शिक्षण संस्थेत अण्णासाहेब लठ्ठे यांना जयंतीदिनी अभिवादन करण्यात आले. यावेळी शरद पाटील, शांतिनाथ कांते आदी ...

Anniversary greetings to Annasaheb Lathe | अण्णासाहेब लठ्ठे यांना जयंतीदिनी अभिवादन

अण्णासाहेब लठ्ठे यांना जयंतीदिनी अभिवादन

१२ लठ्ठे कॉलेज

लठ्ठे शिक्षण संस्थेत अण्णासाहेब लठ्ठे यांना जयंतीदिनी अभिवादन करण्यात आले. यावेळी शरद पाटील, शांतिनाथ कांते आदी उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : लठ्ठे शिक्षण संस्थेत संस्थापक दिवणाबहाद्दूर अण्णासाहेब लठ्ठे यांची १४२ वी जयंती साजरी करण्यात आली. प्रा. शरद पाटील यांनी प्रतिमेला पुष्पहार घातला. ते म्हणाले की, अण्णासाहेब लठ्ठे यांचे विचार समाजाला दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक आहेत. जैन व बहुजन समाजाच्या शैक्षणित उद्धाराचे काम त्यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष शांतिनाथ कांते म्हणाले की, अण्णासाहेब लठ्ठे यांचे विचार समाजाच्या तळागाळात पोहोचण्याची गरज आहे, त्यासाठी त्यांच्या चरित्र ग्रंथाचा संकल्प संस्थेने केला आहे. लवकरच सचित्र व परिपूर्ण चरित्र समाजापुढे पुस्तकरूपाने येईल. कार्यक्रमाला सचिव सुहास पाटील चंद्रकांत पाटील, राजू पाटील, दीपक पाटील, आबासाहेब पाटील, राजू चौधरी, आशालता पाटील यांच्यासह विविध शाखांचे प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

--------------------------------

Web Title: Anniversary greetings to Annasaheb Lathe