जिल्हा बँकेच्या गव्हाण शाखेचा वर्धापन दिन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:31 IST2021-08-14T04:31:28+5:302021-08-14T04:31:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क गव्हाण : गव्हाण (ता. तासगांव) येथील सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेचा २१वा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात ...

जिल्हा बँकेच्या गव्हाण शाखेचा वर्धापन दिन उत्साहात
लोकमत न्यूज नेटवर्क
गव्हाण : गव्हाण (ता. तासगांव)
येथील सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेचा २१वा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी बँकेचे ग्राहक, ठेवीदार व ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रारंभी गव्हाण ग्राम विकास सोसायटीचे माजी अध्यक्ष वसंतराव जाधव व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
ग्राहकांचे सहकार्य, योगदान व चांगल्या प्रतिसादामुळे या शाखेने मोठी प्रगती केली आहे. त्यामुळे आजअखेर १० कोटी १२ लाख रुपयांच्या ठेवी व ८ कोटी २० लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे, अशी प्रतिक्रिया मान्यवरांनी व्यक्त केली. बँकेच्या विविध योजनांची माहिती यावेळी देण्यात आली. गृहकर्ज, वाहन कर्ज योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन शाखाधिकारी अरुण पाटील यांनी केले आहे.
यावेळी विकास सोसायटीचे अध्यक्ष विजय पवार, मच्छिंद्र पवार, हिंदुराव पाटील, अशोक पवार, अक्षय पाटील, अजित भोसले, राजू यादव उपस्थित होते. क्षेत्र अधिकारी एन. बी. पाटील यांनी स्वागत केले, तर शाखाधिकारी अरुण पाटील यांनी आभार मानले.