अंनिसची ११ ते १४ मे दरम्यान ऑनलाइन व्याख्याने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:25 IST2021-05-10T04:25:53+5:302021-05-10T04:25:53+5:30
सांगली : अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे 'फसव्या विज्ञानाविरोधात जनजागरण मोहीम' राबविली जाणार आहे. त्याअंतर्गत ११ ते १४ मे या कालावधीत ...

अंनिसची ११ ते १४ मे दरम्यान ऑनलाइन व्याख्याने
सांगली : अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे 'फसव्या विज्ञानाविरोधात जनजागरण मोहीम' राबविली जाणार आहे. त्याअंतर्गत ११ ते १४ मे या कालावधीत ऑनलाइन व्याख्यानमाला आयोजित केली आहे. संध्याकाळी ५ वाजता झूम आणि फेसबुक पेजवर व्याख्याने होतील.
मंगळवारी (दि.११) 'छद्मविज्ञान विरोधी विशेषांकाचे प्रकाशन' ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सत्यजीत रथ यांच्या हस्ते होईल. 'फसवे विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन' या विषयावर व्याख्यान देतील.
बुधवारी प्रा. प. रा. आर्डे यांचे ' फसव्या विज्ञानाचा ऑक्टोपस' विषयावर व्याख्यान होईल. गुरुवारी वाई येथील स्रीरोग तज्ज्ञ डॉ. शंतनू अभ्यंकर 'छद्म वैद्यक : फसव्या उपचारांचे मायाजाल ' या विषयावर बोलतील. शुक्रवार, १४ मे रोजी डॉ. हमीद दाभोलकर यांच्या 'लोक फसव्या विज्ञानाला का भुलतात?' या व्याख्यानाने सांगता होईल. व्याख्यानांचा लाभ घेण्याचे आवाहन अंनिसने केले आहे.