अण्णासाहेब डांगे लोकराज्य समाजभूषण पुरस्कार अशोक शेंडे, कपिल ओसवाल यांना जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:41 IST2021-02-23T04:41:34+5:302021-02-23T04:41:34+5:30

इस्लामपूर : येथील लोकराज्य विद्या फौंडेशन या सामाजिक संस्थेच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त अण्णासाहेब डांगे लोकराज्य समाजभूषण पुरस्कार प्राथमिक आरोग्य केंद्राचे ...

Annasaheb Dange Lokrajya Samajbhushan Award announced to Ashok Shende and Kapil Oswal | अण्णासाहेब डांगे लोकराज्य समाजभूषण पुरस्कार अशोक शेंडे, कपिल ओसवाल यांना जाहीर

अण्णासाहेब डांगे लोकराज्य समाजभूषण पुरस्कार अशोक शेंडे, कपिल ओसवाल यांना जाहीर

इस्लामपूर : येथील लोकराज्य विद्या फौंडेशन या सामाजिक संस्थेच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त अण्णासाहेब डांगे लोकराज्य समाजभूषण पुरस्कार प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक शेंडे व माजी नगरसेवक कपिल ओसवाल यांना जाहीर झाला.

सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते व माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या अध्यक्षतेखाली वितरण होणार असल्याची माहिती संस्थापक चंद्रशेखर तांदळे यांनी दिली.

येथील आंबेडकरनगरमधील सार्वजनिक स्मशानभूमीत रविवार, दि. २८ रोजी सायंकाळी चार वाजता कार्यक्रम होणार आहे. यावेळी आ. सदाभाऊ खोत, नगराध्यक्ष निशिकांत पाटील, भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल महाडिक, हुतात्मा दूध संघाचे अध्यक्ष गौरव नायकवडी, युवक नेते सम्राट महाडिक, शिवसेना जिल्हा प्रमुख आनंदराव पवार, मुख्याधिकारी अरविंद माळी उपस्थित राहणार आहेत. मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत नियोजन केले असल्याची माहिती तांदळे यांनी दिली.

Web Title: Annasaheb Dange Lokrajya Samajbhushan Award announced to Ashok Shende and Kapil Oswal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.