अण्णाभाऊंच्या लेखनाने मराठी साहित्याच्या कक्षा रुंदावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:31 IST2021-08-13T04:31:11+5:302021-08-13T04:31:11+5:30

अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मिरजेतील कन्या महाविद्यालयात मराठी विभागाने आयोजित 'लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जीवन व कार्य' ...

Annabhau's writings broadened the horizons of Marathi literature | अण्णाभाऊंच्या लेखनाने मराठी साहित्याच्या कक्षा रुंदावल्या

अण्णाभाऊंच्या लेखनाने मराठी साहित्याच्या कक्षा रुंदावल्या

अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मिरजेतील कन्या महाविद्यालयात मराठी विभागाने आयोजित 'लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जीवन व कार्य' या विषयावर त्यांचे ऑनलाइन व्याख्यान पार पडले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शर्वरी कुलकर्णी होत्या. मराठी विभागप्रमुख डॉ. जयकुमार चंदनशिवे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. सागर लटके यांनी करून दिला.

डॉ. गायकवाड यांनी, अण्णाभाऊ हे स्वानुभवातून लेखन करणारे साहित्यिक होते. जगभरातील २७ देशात त्यांच्या साहित्याचे अनुवाद झालेले आहेत. कुसाबाहेरचा माणूस हा केंद्रबिंदू मानून त्यांनी लेखन केले. उपेक्षितांच्या हक्कासाठी लढत असताना ते चळवळीशी जोडले गेले. जातीव्यवस्था, वर्णव्यवस्था यांचा अंत झाला पाहिजे, समताधिष्ठित समाज निर्माणाचे स्वप्न घेऊन ते शेवटपर्यंत जगले. सुमारे २७ वर्षे अण्णाभाऊंनी लिहिलेले साहित्य परिवर्तनाला दिशा देणारे ठरले. शोषण, अत्याचार व जातीव्यवस्थेविरुद्ध आवाज उठवण्यासाठी त्यांनी लिहिलेले साहित्य म्हणजे मानवमुक्तीचा जाहीरनामाच होय, असेही गायकवाड यांनी सांगितले.

प्रा. डॉ. शबाना हळंगळी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. गंगाधर चव्हाण यांनी आभार मानले. प्रा. बाबासाहेब सरगर यांनी तांत्रिक सहकार्य केले.

Web Title: Annabhau's writings broadened the horizons of Marathi literature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.