शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

ना रिफ्लेक्टर, ना दिशादर्शक फलक; सांगली-कोल्हापूर रस्त्यावरील अंकली पुलावरून प्रवास म्हणजे मृत्यूची सापशिडीच

By संतोष भिसे | Updated: November 29, 2024 15:41 IST

पुलावरील रस्ता झुडपांनी भरला

संतोष भिसेसांगली : सांगली-कोल्हापूर रस्त्यावर कृष्णा नदीवरील अंकली (ता. मिरज) पुलावर बुधवारी मध्यरात्री खेडेकर कुटुंबावर काळ कोसळला. अपघात घडलेले ठिकाण धोकादायक आणि जीवघेणे असेच आहे. या रस्त्यावरील वाहतुकीची घनता पाहता हा पूल अपघातांचे केंद्र ठरला आहे. किंबहुना अंकली येथील महामार्ग चौकापासून जयसिंगपूर शहरापर्यंतचा रस्ता वाहनचालकांसाठी प्रचंड धोकादायक आणि डोकेदुखीचा ठरला आहे.बुधवारी मध्यरात्री झालेल्या अपघातात प्रसाद भालचंद्र खेडेकर (वय ३६), प्रेरणा प्रसाद खेडेकर (३५, दोघेही रा. मारुती रस्ता, गावभाग, सांगली) आणि वैष्णवी संतोष नार्वेकर (२१, रा. आकाशवाणी केंद्राजवळ, सांगली) यांचा मृत्यू ओढवला. जयसिंगपूरकडून सांगलीकडे येताना नदीच्या पुलावरून त्यांची चारचाकी नदीपात्रात कोसळली. गाडी कोसळलेले पात्र पूर्णत: कोरडे आहे. तसेच तेथे दगड किंवा पुलाचे बांधकाम असा कोणताही भाग नाही. गाडी सुमारे ३० फूट उंचीवरून खाली आदळल्याने जोराचा मार लागून तिघांचा मृत्यू झाला. गाडी जेथून नदीपात्रात कोसळली, तो रस्त्याचा भाग धोकादायक आणि तीव्र वळणाचा आहे. गाडी कोसळलेल्या ठिकाणी कठडा नाही. जयसिंगपूरहून वेगाने आलेली मोटार या मोकळ्या जागेतून थेट खाली गेली.

अवघ्या एका फुटाने मृत्यूने गाठलेगाडी कोसळली त्या जागेवरून अवघ्या एका फुटावर सिमेंटचा सुरक्षा कठडा सुरू होतो. अनियंत्रित झालेली गाडी फूटभर अंतर जरी पुढे आली असती, तरी कठड्याला धडकून रस्त्यावरच राहिली असती. तिघांचेही जीव वाचले असते. पण तसे होऊ शकले नाही.

पथकर नाका चौक म्हणजे मृत्यूचा सापळाचपथकर नाक्याजवळील हा चौक म्हणजे मृत्यूचा सापळाच आहे. सांगली-जयसिंगपूर, जयसिंगपूर- सांगली आणि जयसिंगपूर-सांगली बायपास हे तीन रस्ते येथे एकत्र येतात. बायपास रस्त्यावरून सांगलीकडे येणारे वाहन चढणीमुळे वेगाने असते. त्याला दिशादर्शनासाठी कोणताही फलक लावलेला नाही. गोंधळलेला चालक थेट सांगली-जयसिंगपूर रस्त्यावर येण्याचा धोका असतो. चौकातील रस्ता अत्यंत खराब असून सर्वत्र धूळ पसरलेली असते. येथे गतिरोधक, मार्गदर्शक फलक किंवा सिग्नल नाहीत. पुरेसे पथदिवेही नाहीत. भरीस भर म्हणून छोट्या व्यावसायिकांनी रस्त्याकडेला दुकाने थाटली आहेत.

पुलावरील रस्ता झुडपांनी भरलासांगली ते जयसिंगपूर आणि जयसिंगपूर ते सांगली हे पुलावरील दोन्ही रस्ते झाडीझुडपांनी भरले आहेत. झुडपांमुळे त्यांची रुंदी कमी झाली आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंना भरावावर मोठ्या प्रमाणात झुडपांचे साम्राज्य आहे. त्यामध्ये रस्ता हरवून जातो. धोकादायक वळणांवर रिफ्लेक्टर किंवा फलक नाहीत. पुलावरील कठड्यांचा रंगही निघून चालला आहे. दररोज ४० हजारांहून अधिक वाहने धावणाऱ्या या रस्त्याच्या सुरक्षिततेकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आहे. परराज्यातून किंवा परजिल्ह्यातून आलेला चालक या पुलावरून प्रवास करताना हमखास गोंधळतो.

टॅग्स :Sangliसांगलीkolhapurकोल्हापूरAccidentअपघातroad transportरस्ते वाहतूक