अंकलीत मारामारी

By Admin | Updated: June 22, 2014 00:29 IST2014-06-22T00:25:56+5:302014-06-22T00:29:07+5:30

पाच जखमी : सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल

Ankit war | अंकलीत मारामारी

अंकलीत मारामारी

सांगली : किरकोळ कारणावरून अंकली (ता. मिरज) येथे दोन गटांत जोरदार मारामारी झाली. यामध्ये पाचजण जखमी झाले आहे. काल (शुक्रवार) रात्री ही घटना घडली. याप्रकरणी सहा संशयितांविरुद्ध सांगली ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
विमल अश्वीनकुमार चौगुले (वय ५०), सविता अभिजित चौगुले (२५), हर्षवर्धन अश्वीनकुमार चौगुले (२९) व अभिजित अश्वीनकुमार चौगुले (३२, सर्व रा. अंकली) अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये पवन दादासाहेब खवाटे, शशिकांत खवाटे, विलास खवाटे, दादासाहेब बाळासाहेब खवाटे (चौघे रा. अंकली), प्रकाश जयगोंडा पाटील (कुंभोज, ता. हातकणंगले) व शीतल भरमा भीलवडे (वाळवा) यांचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संशयित व जखमी शेजारी राहतात. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद सुरू आहे. हा वाद शुक्रवारी रात्री पुन्हा उफाळून आला. त्याचे पर्यवसान मारामारीत झाले. संशयितांनी चौगुले यांच्या घरात घुसून सर्वांना लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेनंतर तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी याप्रकरणी सहा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Ankit war

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.