अंजनीत आर. आर. पाटील यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:31 IST2021-08-17T04:31:51+5:302021-08-17T04:31:51+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क गव्हाण : माजी गृहमंत्री आर. आर. (आबा) पाटील यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी अंजनी (ता. तासगाव) येथे निर्मलस्थळावर ...

Anjanit R. R. Greetings to Patil | अंजनीत आर. आर. पाटील यांना अभिवादन

अंजनीत आर. आर. पाटील यांना अभिवादन

लोकमत न्यूज नेटवर्क

गव्हाण :

माजी गृहमंत्री आर. आर. (आबा) पाटील यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी अंजनी (ता. तासगाव) येथे निर्मलस्थळावर अभिवादन करण्यात आले.

आई भागिरथी, पत्नी आमदार सुमन पाटील, कन्या स्मिता, सुप्रिया, मुलगा रोहित, बंधू राजाराम, सुरेश यांसह आबा कुटुंबीयांनी स्मृतिस्थळाचे दर्शन घेतले. राष्ट्रवादीच्या नेत्यांसह जिल्ह्यातील मान्यवरांनीही अभिवादन केले.

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, ताजुद्दीन तांबोळी, ॲड. बाबासाहेब मुळीक, जिल्हा परिषदेचे सदस्य सागर पाटील, सतीश पवार, संजय पाटील आणि अर्जुन माने, पंचायत समितीच्या सभापती कमल पाटील, उपसभापती डाॅ. शुभांगी पाटील, गटविकास अधिकारी दीपा बापट, जिल्हा नियोजन समिती सदस्य रवींद्र पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नवनाथ मस्के, उपसभापती विवेक शेंडगे यांनी दर्शन घेतले.

ॲड. आर. आर. पाटील खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष विलास पाटील, अमोल पाटील, स्वामी रामानंद भारती सूतगिरणीचे उपाध्यक्ष पतंग माने, युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दत्ता हावळे, अलंकार निकम, आबांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब गुरव, पी. एल. कांबळे, अमोल शिंदे, डाॅ. भारती पाटील,

महांकाली उद्योगसमूहाच्या अध्यक्षा अनिता सगरे, शंतनू सगरे, कवठेमहांकाळच्या माजी नगराध्यक्षा साधना कांबळे, गजानन कोठावळे, हायुम सावनूरकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष टी. व्ही. पाटील, एम. के. पाटील, प्रवीण माळी, दादासाहेब कोळेकर, पंचायत समितीचे सभापती विकास हाक्के, जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत हाक्के,

तालुकाध्यक्षा सुरेखा कोळेकर यांनी स्मृतिस्थळाचे दर्शन घेतले.

Web Title: Anjanit R. R. Greetings to Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.