शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

अंनिसच्या पुढाकाराने आष्ट्यात भोंदू महिलेसह दोघांचा भांडाफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 14:13 IST

अंगात दैवी शक्तीचा संचार होतो, अशा भूलथापा मारून आष्टा (ता. वाळवा) येथे गेल्या चार वर्षापासून विविध समस्यांवर उपाय सांगून लोकांची फसवणूक करणाऱ्या भोंदू महिलेसह दोघांचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीने गुरुवारी पर्दाफाश केला.

ठळक मुद्देअंधश्रद्धा निर्मूलन समितीने पोलिसांच्या मदतीने छापाचार वर्षापासून महिला, तरुणांची फसवणूकआष्ट्यात एका इमारतीमागील खोलीत भोंदूगिरीचा व्यवसाय

आष्टा , दि. २७ : अंगात दैवी शक्तीचा संचार होतो, अशा भूलथापा मारून आष्टा (ता. वाळवा) येथे गेल्या चार वर्षापासून विविध समस्यांवर उपाय सांगून लोकांची फसवणूक करणाऱ्या भोंदू महिलेसह दोघांचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीने गुरुवारी पर्दाफाश केला.

आष्टा पोलिसांच्या मदतीने अंनिसने स्टिंग आॅपरेशन केले. त्यांच्याविरुद्ध जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन रात्री त्यांना अटक करण्यात आली.

कल्पना प्रकाश अत्तारकर (वय ३५, रा. पाचुंब्री, ता. शिराळा) व मुबारक मोहम्मद नदाफ (५२, मालगाव, ता. मिरज) अशी अटक केलेल्या भोंदूंची नावे आहेत. त्यांचा आष्ट्यात शिवाजी चौकातील एका इमारतीमागील खोलीत भोंदूगिरीचा व्यवसाय सुरु होता.

दोघेही पती-पत्नीप्रमाणे एकत्रित राहत होते. आमच्या अंगात दैवी शक्ती संचारते, असे सांगून ते विविध समस्या सोडविण्याचा दावा करीत होते. मूल न होणे, करणी काढणे, भूतबाधा काढणे, लग्न जमविणे, पती-पत्नीचे भांडण सोडविणे, प्रियकर-प्रेयसीचे भांडण सोडविणे, विवाहबाह्य अनैतिक संबंध, तसेच अनैतिक संबंध सुरक्षित यावर ते अघोरी उपाय सांगत असत. यासाठी ते पाचशे रुपयांपासून दहा हजारापर्यंत रक्कम घेत असत.

अंनिसकडे या भोंदूबुवांची तक्रार आली असता, अंनिसने या तक्रारीची चौकशी केली. त्यानंतर त्यांच्याकडे बोगस महिला ग्राहक म्हणून पाठविली. या बोगस ग्राहकाने माझ्या पतीने रखेल ठेवली आहे, ती त्यांना सोडत नाही, अशी तक्रार मांडली. यावर दोघांनी तिला अश्लील व अघोरी उपाय सांगितला. यासाठी तीन हजार रुपयांची मागणी केली. यातून या दोघांची भोंदूगिरी लक्षात येताच अंनिसने आष्टा पोलिसांच्या मदतीने गुरुवारी दुपारी छापा टाकला.

महाराष्ट्र अंनिसचे राज्य प्रधान सचिव प्रशांत पोतदार, राज्य सरचिटणीस संजय बनसोडे, राज्य बुवाबाजी संघर्षचे कार्यवाह भगवान रणदिवे, अवधूत कांबळे, अजय भालकर, सीताराम चाळके, प्रा. नितीन शिंदे, राजेंद्र मोटे, नीलेश कुडाळकर यांच्यासह पोलिस निरीक्षक मिलिंद पाटील, पोलिस नाईक चंद्रकांत माने, अवधूत भाट, अरुण पाटील, अरुणा शिंदे यांनी संयुक्तपणे ही कारवाई केल्याचे पोलिसांनी सांगितले.तक्रारदार पुढे आले...मुबारक नदाफ व कल्पना अत्तारकर गेल्या चार वर्षांपासून भोंदूगिरीचा खुलेआम उद्योग करीत होते. त्यांच्याकडून अनेकांची फसवणूक झाली, पण प्रत्यक्षात तक्रार देण्यासाठी कोणीही पोलिस ठाणे अथवा अंनिसकडे गेले नाही. या दोघांना पकडल्याचे समजताच त्यांच्याविरुद्ध तक्रार देण्यासाठी महिला व तरुणींनी आष्टा पोलिस ठाण्यात गर्दी केली होती.

बुवाबाजीचे साहित्य जप्तखोलीत बुवाबाजीचे साहित्य, मोरपीस गुच्छ, लाकडी पादुका, हळद-कुंकू, गुलाल, अष्टगंध, गळ्यातील ताईत, मुला-मुलींचा फोटो अल्बम, असे साहित्य सापडले आहे.

वाळवा तालुक्यात पहिलाच गुन्हामहाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन अध्यादेश २०१३ नुसार कलम ३ (२) अनुसूची ५ अन्वये वाळवा तालुक्यात आष्टा येथे दाखल झालेला हा पहिलाच गुन्हा आहे. अटकेतील कल्पना अत्तारकर व मुबारक नदाफ यांना शुक्रवारी न्यायालयात उभे करण्यात येणार आहे. हे दोघे एकत्रित कसे राहत होते याचीही चौकशी होणार आहे.

टॅग्स :PoliceपोलिसSangliसांगली