पशुखाद्यांच्या किमती वाढल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:30 IST2021-08-22T04:30:14+5:302021-08-22T04:30:14+5:30
सांगली : दुभत्या व कष्टाचे काम करणाऱ्या जनावरांना सरकी व शेंगपेंड, कडधान्यांचा कोंडा खायला दिला जातो. यामुळे जनावर सुदृढ ...

पशुखाद्यांच्या किमती वाढल्या
सांगली : दुभत्या व कष्टाचे काम करणाऱ्या जनावरांना सरकी व शेंगपेंड, कडधान्यांचा कोंडा खायला दिला जातो. यामुळे जनावर सुदृढ राहून दूध जास्त देते. वाढत्या महागाईचा फटका पशुखाद्यालाही बसला आहे. किमती १० ते १५ टक्क्यांनी वाढल्या आहेत. यामुळे पशुधनाचा सांभाळ करणाऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. कारण, पशुखाद्याचे दर वाढले असले, तरी दुधाचे व दुधाच्या पदार्थांचे भाव वाढलेले नाही.
क्षमतेपेक्षा जादा वाहतूक बंद करण्याची मागणी
सांगली : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर क्षमतेपेक्षा जादा वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. क्षमतेपेक्षा जादा वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे अपघातही वाढत आहेत. विशेषत: वाळू वाहतुकीच्या या वाहनांमुळे रस्त्यांचेही मोठे नुकसान होत आहे. क्षमतेपेक्षा जादा माल वाहतूक करणाऱ्या वाहनांवर परिवहन अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
रस्त्यालगत वाहनांवर कारवाई करा
सांगली : सांगली शहरातील स्टेशन चौकात अगदी रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहने उभी केली जातात. हीच परिस्थिती कॉलेज कॉर्नर, कॉलेज कॉर्नर ते माधवनगर रस्त्यांवर आहे. वाहने रस्त्यांवर लावल्यामुळे अनेकवेळा रुग्णवाहिकांना खूप अडचणीतून प्रवास करावा लागत आहे. रस्त्यांवरील वाहनांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.