शिरटे येथे अनिल पाटील यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:27 IST2021-08-15T04:27:18+5:302021-08-15T04:27:18+5:30

फोटो ओळ : शिरटे (ता. वाळवा) येथे हणमंतराव पाटील, दिलीपराव देसाई यांच्याहस्ते अनिल पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ...

Anil Patil felicitated at Shirte | शिरटे येथे अनिल पाटील यांचा सत्कार

शिरटे येथे अनिल पाटील यांचा सत्कार

फोटो ओळ : शिरटे (ता. वाळवा) येथे हणमंतराव पाटील, दिलीपराव देसाई यांच्याहस्ते अनिल पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सुनील पोळ, एल. आर. पाटील, श्रीरंग पाटील उपस्थित होते.

शिरटे : माझ्या यशस्वी वाटचालीत मित्र व गावची साथ महत्त्वाची आहे. गाव हे माझे कुटुंब मानले असून कोणत्याही संकटावेळी मी तत्पर उभा असेन, अशी ग्वाही युवा उद्योजक अनिल पाटील यांनी दिली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांनी केलेला सत्कार हा मायेचा सत्कार असल्याची भावना व्यक्त केली.

शिरटे (ता. वाळवा) येथे अनिल पाटील यांनी दोनशे पूरग्रस्त कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. यानिमित्त ग्रामस्थांच्या वतीने अनिल पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. ‘कृष्णा’चे माजी अध्यक्ष पै. हणमंतराव पाटील अध्यक्षस्थानी होते.

टायगर ग्रुपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष भैयासाहेब बंडगर, शिवसेना कोरेगाव शाखाप्रमुख गणेश थोरात, टायगर ग्रुपचे किशोर काळदाते, पंचायत समिती सदस्य सुनील पोळ, बाजार समिती सदस्य दिलीपराव देसाई, ‘कृष्णा’चे माजी संचालक एल. आर. पाटील, जगन्नाथ रणदिवे, अजित पाटील, उपसरपंच अरुण देसाई, संजय देसाई, पंढरीनाथ पाटील, गुलाबराव पाटील, पोपट देसाई, श्रीरंग पाटील, प्रकाश देसाई आदींची प्रमुख उपस्थिती होती.

विश्वास देसाई, सदानंद पाटील, जयवंत देसाई, प्रशांत रणदिवे, दत्तात्रय सावंत, प्रा. आदर्श पाटील, सुनील पाटील, श्रीपाद मालेकर, योगेश तावरे, रवी देसाई, अक्षय पाटील, यश पाटील, विराज जाधव, सौरभ पोळ, अमर देसाई यांनी संयोजन केले.

Web Title: Anil Patil felicitated at Shirte

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.