अनिकेत कोथळे खून खटल्याची आजपासून सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:24 IST2021-01-18T04:24:57+5:302021-01-18T04:24:57+5:30

सांगली : काेरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे स्थगित करण्यात आलेल्या न्यायालयीन कामकाजामुळे खंडित झालेली अनिकेत कोथळे खून खटल्याची सुनावणी आज, सोमवारपासून ...

Aniket Kothale murder case to be heard from today | अनिकेत कोथळे खून खटल्याची आजपासून सुनावणी

अनिकेत कोथळे खून खटल्याची आजपासून सुनावणी

सांगली : काेरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे स्थगित करण्यात आलेल्या न्यायालयीन कामकाजामुळे

खंडित झालेली अनिकेत कोथळे खून खटल्याची सुनावणी आज, सोमवारपासून पुन्हा सुरू होत आहे. या खटल्याची सुनावणी प्रमु‌ख जिल्हा व सत्र न्यायाधीश विजय पााटील यांच्यासमोर होत आहे. या खटल्यात विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम हे सरकारी पक्षाची बाजू मांडत आहेत. शहर पोलीस ठाण्याच्या कोठडीत अनिकेत कोथळे या तरुणाचा पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मारहाण करून खून केल्याची घटना ६ नोव्हेंबर २०१७ रोजी घडली होती. याप्रकरणी बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, नसरुद्दीन मुल्ला, राहुल शिंगटे आणि झिरो पोलीस झाकीर पट्टेवाले या संशयितांच्या विरोधात खटला सुरू आहे. पोलिसांनी केलेल्या मारहाणीत मृत्यूनंतर त्याचा मृतदेह आंबोली घाटातील निर्जनस्थळी नेऊन जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता.

आता सोमवारपासून सलग चार दिवस या खटल्याची सुनावणी होणार आहे.

Web Title: Aniket Kothale murder case to be heard from today