शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अनिकेत कोथळे खूनप्रकरण: पोलिस निरीक्षक राजन माने यांचा उलटतपास पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2023 12:40 IST

कोठडीत असताना मारहाणीत अनिकेतचा मृत्यू झाला होता

सांगली : शहर पोलिस ठाण्याच्या कोठडीतील मारहाणीत मृत्युमुखी पडलेल्या अनिकेत कोथळे खून खटल्याची नियमित सुनावणी मंगळवारपासून सुरू झाली. या खटल्यातील फिर्यादी आणि तत्कालीन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक राजन माने यांचा उलटतपास बचाव पक्षाच्या वतीने घेण्यात आला. यावेळी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम उपस्थित होते. उलटतपासात माने यांना सर्व बाजूंनी प्रश्न विचारण्यात आले.सांगली शहर पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात संशयित म्हणून कोथळेसह अन्य एकाला ताब्यात घेतले होते. कोठडीत असताना दोघांना मारहाण करण्यात आली होती. यात कोथळेचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी मुख्य संशयित बडतर्फ पालिस उपनिरीक्षक युवराज कामटे, अनिल लाड, नसरुद्दीन मुल्ला, राहुल शिंगटे आणि झिरो पोलिस झाकीर पट्टेवाले आदींच्या विरोधात खटल्याची सुनावणी सुरू आहे. या खटल्यातील अन्य एक संशयित अरुण टोणे याचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला आहे.या खटल्यात फिर्यादी असलेल्या पोलिस निरीक्षक माने यांची साक्ष अधिक महत्त्वाची आहे. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी त्यांचा सरतपास पूर्ण केला आहे. त्यावेळी माने यांनी घटनेतील घटनाक्रम आणि संशयितांचे कृत्य याबाबत सविस्तर माहिती न्यायालयात दिली आहे. आता उलटतपास बचाव पक्षाच्या वतीने वकील ॲड. गिरीश तपकिरे यांनी मंगळवारी पूर्ण केला. आज, बुधवारीही या खटल्याच्या सुनावणीचे कामकाज चालणार आहे.

टॅग्स :SangliसांगलीAniket Kothale Murderअनिकेत कोथळे मृत्यूप्रकरणPoliceपोलिस