शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

संतप्त धरणग्रस्त आंदोलक घुसले इस्लामपूर तहसील कार्यालयात, पोलिसांची उडाली तारांबळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2023 15:30 IST

'ही जनता मालक म्हणून इथे येऊन न्यायासाठी बसली आहे प्रशासन जनतेसाठी चालते हे लक्षात ठेवा'

युनूस शेखइस्लामपूर : गेल्या ४० वर्षांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी १६१ मोर्चे काढून अनेक आंदोलने करणाऱ्या वारणा धरणग्रस्त आणि चांदोली प्रकल्पग्रस्त कुटुंबांनी आज दुसऱ्या दिवशी थेट तहसील कार्यालयात घुसून प्रशासन आणि शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलकांच्या या आक्रमक भूमिकेमुळे पोलिसांचीही तारांबळ उडाली होती. आंदोलकांच्या गर्दीने तळमजला पूर्ण भरून गेला होता. घटनास्थळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.सोमवारी थकीत कबजेपट्टीच्या नोटीसा मागे घ्याव्यात यासह इतर मागण्यासाठी धरणग्रस्त संघटनेचे नेते गौरव नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली दिवसभर भर उन्हात बसून आंदोलन केले. सायंकाळपर्यंत यावर अधिकाऱ्यांच्या बैठकीत तोडगा न निघाल्याने धरणे आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. याचवेळी नायकवडी यांनी आंदोलनाची रूपरेषा जाहीर करत प्रशासनाला जागे केले होते.आज, मंगळवारी सर्व आंदोलक पुन्हा तहसील कार्यालयासमोर एकत्र जमले. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय आहे. सकाळी आंदोलनाला सुरुवात करताना पुन्हा महिलांनी संघर्ष गाणी गात वातावरण तापवले यातच उन्हाचा चटका तीव्र होऊ लागल्याने प्रशासन लक्ष देत नाही तर आत घुसण्याचा गनिमी कावा यशस्वी करत तहसील कार्यालयातील तळ मजल्यावर ठिय्या मारत ताबा घेतला.माजी मंत्री सदाभाऊ खोत, भाजपचे नेते सम्राट महाडिक, विक्रम पाटील,संतोष घनवट यांनी आंदोलस्थळी येऊन पाठिंबा जाहीर केला. खोत म्हणाले, सरकार कधी सावकार होऊ शकत नाही मात्र महाविकास आघाडीचे सरकारने १२ टक्के व्याजासह या नोटीसा पाठवून अन्याय केला आहे. सरकार असले काय आणि नसले काय, मला फरक पडत नाही. सरकार कुणाचेही असुदे. या न्याय मागण्यासाठी आलेल्या आंदोलकांवर गुन्हे दाखल करू नका अन्यथा त्या अधिकाऱ्यांना इथे ठेवणार नाही. ही जनता मालक म्हणून इथे येऊन न्यायासाठी बसली आहे प्रशासन जनतेसाठी चालते हे लक्षात ठेवा. आंदोलकांना न्याय मिळेपर्यंत तुमच्या पाठीशी राहू.सम्राट महाडिक म्हणाले, फडणवीस सरकारचा शासन निर्णय रद्द करून महाघोटाळे सरकारने नवीन निर्णय घेत या अन्यायी नोटीसा पाठवल्या आहेत. अधिकाऱ्यांनी शक्य त्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात अन्यथा त्यांना बाहेर पडू देणार नाही.विक्रम पाटील म्हणाले, भूसंपादन अधिकारी लाटकर हे मनमानी कारभार करत आहेत. धरणग्रस्तांना तुच्छतेची वागणूक देतात.त्यांच्यावर कारवाई करावी. फडणवीस सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी करून या आंदोलकांना न्याय द्यावा. यावेळी घोषणाबाजी करत आंदोलकांनी कार्यालय परिसर दुमदुमून सोडला होता.

..अन्यथा कारवाई करावी लागेलआंदोलक कार्यालयाच्या प्रवेशद्वारातून आत जाताना गोंधळ उडाला. यावेळी पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या हाताला किरकोळ दुखापत झाली. तहसीलदार प्रदीप उबाळे यांनी या घटनेची गंभीर दखल घेत आंदोलकांनी शांततेत आंदोलन करावे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आम्हाला कारवाई करावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला.

टॅग्स :Sangliसांगलीislampur-acइस्लामपूर