शिराळ्यात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:26 IST2021-08-29T04:26:01+5:302021-08-29T04:26:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : अंगणवाडी सेविकांना शासनाने कामकाजासाठी दिलेले मोबाईल निकृष्ट दर्जाचे आहेत. यामुळे शनिवारी ते मोबाईल ...

शिराळ्यात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : अंगणवाडी सेविकांना शासनाने कामकाजासाठी दिलेले मोबाईल निकृष्ट दर्जाचे आहेत. यामुळे शनिवारी ते मोबाईल अंगणवाडी प्रकल्प अधिकारी सतीश नवले यांना परत केले. यावेळी सेविकांनी निषेधाच्या घोषणा दिल्या.
तालुकाध्यक्षा अलका विभूते, उपाध्यक्ष सरला घोडे-पाटील म्हणाल्या, शासनाने पोषण ट्रॅकर हे मोबाईलमध्ये अँप दिले आहे. ते पूर्ण इंग्रजीमधून आहे. अंगणवाडी सेविका कमी शिक्षण झालेल्या असून, त्यांना इंग्रजी भाषेत काम करणे शक्य नाही. शासनाने संंबंधित ॲप मराठीतूनच द्यावे. त्याचप्रमाणे चांगल्या दर्जाचा मोबाईलही द्यावा, अशी आमची मागणी आहे. या आंदोलनात सचिव हसीना नायकवडी, कमल पाटील, बीटप्रमुख पुष्पा पाटील, शारदा माने, कांता खोत आदींसह अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.