अंगणवाडी कर्मचारी काळ्या फिती लाऊन काम करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:18 IST2021-01-10T04:18:52+5:302021-01-10T04:18:52+5:30

सांगली : उत्तर प्रदेशातील अंगणवाडी मदतनीसवर पुजाऱ्याने बलात्कार करून खून केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचारी सोमवारी व मंगळवारी (दि. ...

Anganwadi staff will work with black ribbons | अंगणवाडी कर्मचारी काळ्या फिती लाऊन काम करणार

अंगणवाडी कर्मचारी काळ्या फिती लाऊन काम करणार

सांगली : उत्तर प्रदेशातील अंगणवाडी मदतनीसवर पुजाऱ्याने बलात्कार करून खून केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचारी सोमवारी व मंगळवारी (दि. ११ व १२) काळ्या फिती लावून निषेध नोंदवणार आहेत. गुन्हेगारांवर कारवाईसाठी उत्तर प्रदेश सरकार गंभीर नाही, याचाही निषेध अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने केला आहे. समितीचे नेते एम. ए. पाटील यांनी सांगितले की, दिल्लीतील निर्भया बलात्काराशी मिळतीजुळती ही घटना आहे. तेथील सरकारने आरोपींना शोधून कठोरातील कठोर शिक्षा करावी, पोलीस अंमलदारालाही कठोर शासन करावे या मागणीसह महाराष्ट्रातील सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी सेविका दोन दिवस काळ्या फिती लावून काम करतील. उत्तर प्रदेश सरकारने अत्याचारग्रस्त कुटुंबाला संरक्षण आणि आर्थिक मदत देऊन पुनर्वसन करावे, अशी आमची मागणी आहे. यावेळी शुभा शमीम, कमल परुळेकर, दिलीप उटाणे, भगवानराव देशमुख, सुवर्णा तळेकर, जयश्री पाटील, रेखा पाटील, आदी उपस्थित होते.

------------------

Web Title: Anganwadi staff will work with black ribbons