अंधकवी चंद्रकांत देशमुखे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:18 IST2021-06-10T04:18:56+5:302021-06-10T04:18:56+5:30
कडेगाव : कडेगाव येथील अंधकवी चंद्रकांत भाऊसो देशमुखे (वय ७५) यांचे बुधवारी दि. ९ जून रोजी हृदयविकाराने निधन झाले. ...

अंधकवी चंद्रकांत देशमुखे यांचे निधन
कडेगाव : कडेगाव येथील अंधकवी चंद्रकांत भाऊसो देशमुखे (वय ७५) यांचे बुधवारी दि. ९ जून रोजी हृदयविकाराने निधन झाले. डोळ्यांनी अंध असूनही त्यांनी स्वतःला आपण व्यंग आहोत, असे कधीच भासू दिले नाही. सामाजिक क्षेत्रात त्यांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे काम करीत होते.
अखिल भारतीय साहित्य संमेलनात त्यांचे उल्लेखनीय योगदान होते.
कर्नाटक राज्यातील बेळगाव
जिल्ह्यात खानापूर येथे झालेले मराठी साहित्य संमेलन त्यांच्या अध्यक्षतेखाली झाले होते. त्यांच्या कवितांची दखल घेत, त्यांना अखिल भारतीय साहित्य संमेलनात त्यांना ‘जे न देखे रवि ते देखे कवी हा २०१९ चा पुरस्कार’ प्राप्त मिळाला आहे, तसेच ते दक्षिण महाराष्ट्र अपंग (दिव्यांग ) साहित्य संमेलन २०२० चे ते अध्यक्ष होते. त्याचबरोबर, त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. साहित्य क्षेत्रातील एक अस्सल हिरा हरपला. सामाजिक व साहित्य क्षेत्रात या घटनेची हळहळ व्यक्त होत आहे.