हुतात्मा नानकसिंग विद्यालयात आनापान साधना वर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:27 IST2021-04-02T04:27:11+5:302021-04-02T04:27:11+5:30
वारणावती : धावपळीच्या जीवनात सोशल मीडियात गुरफटलेल्या तरुणांना आनापान साधना वर्ग महत्त्वाची आहेत, असे प्रतिपादन मुख्याध्यापक व शिराळा ...

हुतात्मा नानकसिंग विद्यालयात आनापान साधना वर्ग
वारणावती : धावपळीच्या जीवनात सोशल मीडियात गुरफटलेल्या तरुणांना आनापान साधना वर्ग महत्त्वाची आहेत, असे प्रतिपादन मुख्याध्यापक व शिराळा पंचायत समितीचे उपसभापती बाळासाहेब नायकवडी यांनी केले.
बाळासाहेब नायकवडी यांनी आनापाना साधना वर्गाचे फायदे सांगून या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. विद्यार्थी व शिक्षकांना विपश्यना शिबिरामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.
आनापान साधना वर्गाविषयी जितेंद्र लोकरे म्हणाले की, महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभागअंतर्गत शाळेमध्ये आनापान साधना वर्ग भरविण्याचे आदेश शिक्षण आयुक्त विशाल सोळंखी यांनी दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या जीवनातील ताणतणाव, आत्मविश्वासाचा अभाव, वाढती वैफल्यग्रस्तता यावर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातच आनापान साधना करणे गरजेचे आहे.
हुतात्मा नानकसिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आनापान साधना वर्ग भरविण्यात आला व त्याचे प्रात्यक्षिक जितेंद्र लोकरे यांनी दिले. यावेळी पर्यवेक्षक एस. ए. गायकवाड, गंगाराम पाटील, महेंद्र पाटील आदी उपस्थित होते. आर. डी. लुगडे यांनी आभार मानले.