शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील इस्लामपुरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी बालकाचा मृत्यू, प्रशासनाविरोधात संतापाची लाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 17:20 IST

रेबिज प्रतिबंधक लस देण्यात आली होती. मात्र, तरीही या मुलाला ताप येत होता. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हसनच्या मेंदूपर्यंत विकार बळावल्याचे सांगितले.

इस्लामपूर : शहरातील डंगरे गल्लीत भटक्या श्वानांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या पाच वर्षीय बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हसन अर्शद डंगरे असे मृत मुलाचे नाव आहे. यामुळे पालिका प्रशासनाविरोधात संतापाची लाट उसळली आहे.हसन डंगरे ८ जानेवारीला मदिना कॉलनीतील मामाकडे गेला होता. तेथे भटक्या कुत्र्यांनी त्याच्या उजव्या डोळ्याजवळ चावा घेतला होता. त्यानंतर गंभीर अवस्थेत त्याच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून सांगलीच्या शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले होते. तेथे त्याला रेबिज प्रतिबंधक लस देण्यात आली होती. मात्र, तरीही या मुलाला ताप येत होता. कऱ्हाड आणि सांगलीत उपचारासाठी आणल्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हसनच्या मेंदूपर्यंत विकार बळावल्याचे सांगितले.

त्यामुळे त्याला पुण्यातील खासगी रुग्णालयात नेण्यात येत हाेते. मात्र, वाटेतच त्याचा मृत्यू झाला. चाँदतारा मोहल्ला परिसरातही मुस्तफा शहाबुद्दीन जहागीरदार या पाच वर्षांच्या मुलाच्या मांडीला भटक्या कुत्र्यांनी चावे घेतले होते.शहराच्या विविध भागात भटक्या श्वानांकडून हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, तरीही पालिका प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेलेली नाही. नागरिकांनी संपर्क केला असता प्रतिसाद दिला जात नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांनी पालिकेचे आरोग्य अधिकारी अनिकेत हेंद्रे यांना निवेदन देऊन भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली.

पालिकेतील अधिकारी आणि खातेप्रमुखांकडून चुकीचा कारभार सुरू आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत प्रशासनाकडून बेजबाबदारीचे वर्तन घडत आहे. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त प्रशासनाने केलेला नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी व राज्य शासनाकडे रितसर तक्रार करणार आहे. - विक्रम पाटील, माजी नगरसेवक

टॅग्स :Sangliसांगलीdogकुत्राDeathमृत्यू