शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

Sangli: तोंडावर उशी दाबून वयोवृद्ध पतीने घेतला पत्नीचा जीव, वारंवार भांडणाच्या त्रासाला कंटाळून केलं कृत्य

By हणमंत पाटील | Updated: November 11, 2023 12:07 IST

कवठेमहांकाळ : कुची (ता. कवठेमहांकाळ) येथे पती-पत्नीमध्ये वारंवार होणाऱ्या भांडणाच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून पतीने पत्नीचा तोंडावर उशी दाबून खून ...

कवठेमहांकाळ : कुची (ता. कवठेमहांकाळ) येथे पती-पत्नीमध्ये वारंवार होणाऱ्या भांडणाच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून पतीने पत्नीचा तोंडावर उशी दाबून खून केला. बुधवार दि. ८ राेजी पहाटे घडलेला हा प्रकार शुक्रवार दि. १० राेजी सकाळी उघडकीस आला. लतिका तानाजी पाटील (वय ६५, रा. कुची) असे मृत महिलेचे नाव आहे.कवठेमहांकाळ पोलिसांत वयोवृद्ध पती तानाजी बापू पाटील (७४, रा. कुची) याच्याविराेधात खून करून पुरावा नष्ट करणे व खोटी माहिती दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद प्रवीण तानाजी पाटील (३९, रा. मुंबई मूळ गाव कुची) यांनी दिली आहे.कुची गावापासून काही अंतरावर पाटील वस्तीवर पाटील कुटुंबीय राहते. वयोवृद्ध असलेले तानाजी पाटील आणि त्यांची पत्नी लतिका हे गावी राहत होते तर मुलगा प्रवीण हा मुंबईस असताे. गावी तानाजी पाटील याचा पत्नी लतिका यांच्यासाेबत सतत वाद हाेत असे. दिवाळीसाठी त्या नेरुळला (मुंबई) येण्यास तयार नव्हत्या. यावरुन बुधवारी पहाटे दाेघांमध्ये वादावादी झाली. रागाच्या भरात तानाजीने लतिका पाटील यांना चापट मारून खाली पाडले आणि तोंडावर उशी दाबून त्यांचा खून केला.

या प्रकारानंतर त्याने लतिका यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा बनाव केला. नातेवाईकांना तसे कळवून मृतदेहावर अंत्यसंस्कारही केले. लतिका यांचा घातपात झाल्याची माहिती पोलिस निरीक्षक जोतीराम पाटील यांना गाेपनीय सूत्रांकडून मिळाली. त्यानंतर त्यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देत घटनेचा उलगडा केला. वयोवृद्ध पत्नीचा खून करून खोटी माहिती देत अंत्यविधी करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी तानाजी पाटील याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.याबाबतची फिर्याद मुलगा प्रवीण पाटील याने कवठेमहांकाळ पोलिसांत दिली आहे. पोलिसांनी तानाजी पाटील याला ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक जोतिराम पाटील करत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी