दरीबडची उपसरपंचपदी काँग्रेसचे आमोगसिध्दा शेंंडगे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:06 IST2020-12-05T05:06:05+5:302020-12-05T05:06:05+5:30
संख : दरीबडची (ता. जत) येथील उपसरपंचपदी काँग्रेसचे आमोगसिध्दा शेंंडगे यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामविकास अधिकारी ...

दरीबडची उपसरपंचपदी काँग्रेसचे आमोगसिध्दा शेंंडगे
संख : दरीबडची (ता. जत) येथील उपसरपंचपदी काँग्रेसचे आमोगसिध्दा शेंंडगे यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामविकास अधिकारी व्ही. बी. वाघमोडे होते. ग्रामपंचायतीच्या सभेत ही निवड करण्यात आली.
ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसने १३ पैकी ११ जागा व सरपंचपद जिंकले होते. ग्रामपंचायतीवर काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. उपसरपंच पदावर काम करण्याची संधी सर्वांना मिळावी, यासाठी एका वर्षाची संधी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार उपसरपंच रमेश मसाळ यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे जागा रिक्त झाली होती. उपसरपंचपदी अमोगसिध्दा शेंंडगे यांची बिनविरोध निवड झाली. नूतन उपसरपंच अमोगसिध्दा शेंंडगे यांचा सत्कार माजी पंचायत समिती सदस्य गंगाधर मोरडी यांच्याहस्ते करण्यात आला.
यावेळी उपसरपंच रमेश मसाळ, शिवानंद मोरडी, शिवानंद माळी, ग्रामपंचायत सदस्य राजू आटपाडकर, पोपट माने, तिल्याळचे सरपंच सुरेश कटरे, भीमू माळी, बसवराज जामगोंड, आप्पासाहेब गेजगे उपस्थित होते.
फोटो ओळ : दरीबडची (ता. जत) येथील नूतन उपसरपंच अमोगसिध्दा शेंंडगे यांचा सत्कार माजी पंचायत समिती सदस्य गंगाधर मोरडी यांच्याहस्ते केला.