सुधार समितीसह अमित शिंदे राष्ट्रवादीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:32 IST2021-08-17T04:32:26+5:302021-08-17T04:32:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्हा सुधार समितीचे नेते ॲड. अमित शिंदे यांनी रविवारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या ...

Amit Shinde in NCP with Reforms Committee | सुधार समितीसह अमित शिंदे राष्ट्रवादीत

सुधार समितीसह अमित शिंदे राष्ट्रवादीत

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : जिल्हा सुधार समितीचे नेते ॲड. अमित शिंदे यांनी रविवारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी समितीच्या बहुतांश पदाधिकारी व सदस्यांनीही त्यांच्यासोबत राष्ट्रवादीत प्रवेश केला.

गेल्या काही वर्षांपासून महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यात सुधार समितीने सामाजिक कार्य केले. राजकीय पक्ष म्हणून त्यांनी महापालिकेची निवडणूकही लढवली होती. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी नेत्यांची व शिंदे यांची सलगी दिसत होती. त्यामुळे पक्षप्रवेशाचे संकेत मिळत होते. रविवारी सांगलीतील एका कार्यक्रमात शिंदे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी त्यांनी समितीच्या अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह प्रवेश केल्याचे जाहीर केले. दोन कार्यकर्त्यांनी प्रवेशाला नकार देत सामाजिक कार्य करण्यास प्राधान्य देणार असल्याचे सांगितल्याने त्याला शिंदे यांनी सहमती दर्शविली.

कोट

सुधार समितीच्या बहुतांश पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. सामाजिक कार्य करताना काही मर्यादा येत होत्या. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली यापुढे समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करत राहू.

- ॲड. अमित शिंदे

Web Title: Amit Shinde in NCP with Reforms Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.