वारकरी मंडळाचे अमित रावताळे तालुकाध्यक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:50 IST2020-12-17T04:50:38+5:302020-12-17T04:50:38+5:30

विटा : अखिल भारतीय वारकरी मंडळाची खानापूर तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, वारकरी मंडळाच्या खानापूर तालुकाध्यक्षपदी घानवड येथील ...

Amit Rawatale taluka president of Warkari Mandal | वारकरी मंडळाचे अमित रावताळे तालुकाध्यक्ष

वारकरी मंडळाचे अमित रावताळे तालुकाध्यक्ष

विटा : अखिल भारतीय वारकरी मंडळाची खानापूर तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, वारकरी मंडळाच्या खानापूर तालुकाध्यक्षपदी घानवड येथील अमितकुमार परशुराम रावताळे-पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली. या निवडीचे पत्र वारकरी मंडळाचे सांगली जिल्हाध्यक्ष विकास पवार ऊर्फ नंदू महाराज यांच्याहस्ते नूतन पदाधिकाऱ्यांना देण्यात आले.

अखिल भारतीय वारकरी मंडळाचे प्रदेशाध्यक्ष अनिल महाराज वाळके व जिल्हाध्यक्ष विकास पवार ऊर्फ नंदू महाराज यांच्या शिफारशीने राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले यांच्या मार्गदर्शनाखाली खानापूर तालुका कार्यकारिणी जाहीर केली. यावेळी वारकरी मंडळाच्या तालुका उपाध्यक्षपदी रामचंद्र काका गायकवाड (बलवडी-खा.), कोषाध्यक्षपदी नेताजी संतू पाटील (बलवडी-खा.), सचिवपदी दत्तात्रय मारुती जांभळे (खानापूर) यांना संधी देण्यात आली. खानापूर तालुका वारकरी मंडळाच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी वारकरी सांप्रदायिक बांधवांच्या विविध अडीअडचणी सोडविण्याबरोबरच त्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी प्रयत्नशील रहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष नंदू महाराज यांनी केले.

फोटो - १६१२२०२०-विटा-अमितकुमार रावताळे, घानवड. हा फोटो वापरणे

Web Title: Amit Rawatale taluka president of Warkari Mandal