अमित ऐवळे यांचे बापूंना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:28 IST2021-02-09T04:28:42+5:302021-02-09T04:28:42+5:30
इस्लामपूर : आटपाडी येथील सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी अमित ऐवळे यांची निवड झाली. यानंतर त्यांनी लोकनेते राजारामबापू ...

अमित ऐवळे यांचे बापूंना अभिवादन
इस्लामपूर : आटपाडी येथील सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी अमित ऐवळे यांची निवड झाली. यानंतर त्यांनी लोकनेते राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील लोकनेते बापूंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी जिल्हा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सरचिटणीस बाळासाहेब पाटील यांनी स्वागत केले. याप्रसंगी अमित ऐवळे म्हणाले की, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी काम करण्याची संधी दिली आहे. जिल्ह्यात युवकांची संघटना बळकट करण्याचा प्रयत्न करणार आहे.
किसन जानकर, मनोहर चव्हाण, सुरेश शिंगटे, दत्तात्रेय यमगर, दत्तात्रेय कांबळे, दयानंद ऐवळे, विनायक ऐवळे, हणमंत केंगार, दीपक जावीर, विशाल जावीर उपस्थित होते.
फोटो - ०८०२२०२१-आयएसएलएम-राष्ट्रवादी न्यूज
राजारामनगर येथे राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अमित ऐवळे यांनी अभिवादन केले. यावेळी बाळासाहेब पाटील, किसन जानकर, दत्तात्रेय यमगर उपस्थित होते.