तातडीच्या आरोग्य सेवा देण्यासाठी रुग्णवाहिका महत्त्वाची भूमिका बजावतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:31 IST2021-07-14T04:31:50+5:302021-07-14T04:31:50+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : तालुक्यातील तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी मिळालेल्या रुग्णवाहिका ग्रामीण व डोंगरी भागातील नागरिकांना तातडीच्या आरोग्य ...

Ambulances will play an important role in providing emergency health care | तातडीच्या आरोग्य सेवा देण्यासाठी रुग्णवाहिका महत्त्वाची भूमिका बजावतील

तातडीच्या आरोग्य सेवा देण्यासाठी रुग्णवाहिका महत्त्वाची भूमिका बजावतील

लोकमत न्यूज नेटवर्क

शिराळा : तालुक्यातील तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी मिळालेल्या रुग्णवाहिका ग्रामीण व डोंगरी भागातील नागरिकांना तातडीच्या आरोग्य सेवा देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतील, असे प्रतिपादन आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.

शिराळा पंचायत समितीच्या आवारात झालेल्या कार्यक्रमात नाईक यांच्या हस्ते तालुक्यातील मणदूर, कोकरूड व सागाव प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी चाैदाव्या वित्त आयोगातून मिळालेल्या रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषद सदस्या अश्विनी नाईक व संपतराव देशमुख यावेळी प्रमुख उपस्थित होते.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पाटील यांनी स्वागत केले. आमदार नाईक यांच्या हस्ते मणदूर, कोकरूड व सागाव आराेग्य केंद्रांना रुग्णवाहिकांच्या चाव्या प्रदान करण्यात आल्या. यावेळी उपसभापती बी. के. नायकवडी, माजी सभापती सम्राटसिंग नाईक, गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल, उपअभियंता आर. डी. देवकर, बाहुबली हुक्केरी, सागावचे सरपंच तात्यासाहेब पाटील, उपसरपंच सत्यजीत पाटील तसेच पंचायत समितीचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सहाय्यक गटविकास अधिकारी अरविंद माने यांनी आभार मानले.

Web Title: Ambulances will play an important role in providing emergency health care

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.