अमरसिंग जाधव सांगलीचे अप्पर अधीक्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:33 IST2021-09-10T04:33:38+5:302021-09-10T04:33:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांच्या शुक्रवारी बदली झाली. त्यांच्या जागी मुंबईच्या फोर्स वनचे ...

अमरसिंग जाधव सांगलीचे अप्पर अधीक्षक
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांच्या शुक्रवारी बदली झाली. त्यांच्या जागी मुंबईच्या फोर्स वनचे अधीक्षक अमरसिंग जाधव यांची नियुक्ती करण्यात आले. रात्री उशिरा गृह विभागाने बदल्यांचे आदेश जारी केले.
अप्पर अधीक्षक दुबुले यांनी सांगली जिल्ह्यात दोन वर्षांहून अधिक काम काम केले. महापूर, कोरोनाकाळात त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे. महिला अत्याचाराचे गुन्हे रोखण्यासाठी विशेष मोहीम त्यांनी हाती घेतली. तसेच वाढत्या गुन्हेगाराला आळा घालण्यासाठी ॲक्शन प्लॅन तयार करून त्यांची अंमलबजावणी केली. दुबुले यांची कोल्हापूर गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या जागी मुंबईतील टास्क फोर्सचे अधीक्षक अमरसिंग जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जाधव हे मूळचे सातारा जिल्ह्यातील आहेत. त्यांनी करवीरचे पोलीस उपअधीक्षक म्हणून प्रभावी कामगिरी केली होती. ते लवकरच सांगलीचा पदभार स्वीकारतील.
कोल्हापूर आर्थिक गुन्हे विभागाच्या उपअधीक्षक पद्मावती शिवाजी कदम यांची विटा उपविभागीय अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा बदल्यांचे आदेश गृह विभागाकडून देण्यात आले.