शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

‘अ‍ॅमनेस्टी स्कीम’ पुन्हा केंद्राने लागू करावी : किरण तारळेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 21:25 IST

अपुरे प्रशासकीय नियोजन आणि घाईगडबडीमुळे फसलेली नोटाबंदी व त्यापाठोपाठच्या जीएसटी प्रणालीमुळे देशात उद्योगांसह व्यापार क्षेत्रालाही मंदीला तोंड द्यावे लागत आहे.

ठळक मुद्दे अर्थव्यवस्थेला गती मिळणे शक्यवस्त्रोद्योग साखळीत तर अस्तित्वाची लढाई सुरू आहे

विटा (जि. सांगली) : अपुरे प्रशासकीय नियोजन आणि घाईगडबडीमुळे फसलेली नोटाबंदी व त्यापाठोपाठच्या जीएसटी प्रणालीमुळे देशात उद्योगांसह व्यापार क्षेत्रालाही मंदीला तोंड द्यावे लागत आहे.

वस्त्रोद्योग साखळीत तर अस्तित्वाची लढाई सुरू आहे. रोख व्यापारावर आलेले निर्बंध विचारात घेता, केंद्र शासनाने यापूर्वी काळा पैसा पांढरा करण्यासाठी वापरलेली ‘अ‍ॅमनेस्टी स्कीम’ पुन्हा एकदा लागू करावी, अशी मागणी विटा यंत्रमाग संघाचे अध्यक्ष किरण तारळेकर यांनी गुरुवारी ‘लोकमत’शी बोलताना केली. यामुळे बहुतांशी काळ्या पैशाचे प्रगटीकरण होऊन देशभरात मरगळलेल्या बाजार पेठांबरोबरच अर्थव्यवस्थेला गती मिळू शकेल, असेही त्यांनी सांगितले.

तारळेकर म्हणाले की, केंद्राने अपुऱ्या तयारीने व घाईगडबडीत एक हजार व ५०० रुपयांच्या नोटाबंदीचा निर्णय लागू केला. हा निर्णय घेताना देशात चलनात असलेल्या १५.४१ लाख कोटी रुपयांच्या चलनापैकी फक्त पांढरा पैसा बदलून चलनात येईल व किमान तीन लाख कोटी रुपयांचा काळा पैसा आपोपाप चलनातून बाहेर जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, नोटा बदलून द्यायच्या नियमांतील त्रुटींचा गैरफायदा यंत्रणेने घेतल्याने व भ्रष्ट प्रशासनामुळे बड्या काळ्या पैसेवाल्यांसह देशातील सर्वच चलन बदलले गेले.

रिझर्व्ह बॅँकेच्या घोषणेनुसार ९९.३ टक्के नोटा बदलून दिल्याचे सांगितले जाते. याचा अर्थ नोटाबंदीच्या माध्यमातून काळा पैसा चलनातून बाहेर काढण्याचा केंद्राचा उद्देश फसल्याचे दिसून येत आहे. ते म्हणाले की, या काळ्या पैशाचा वापर देशातील इतर गैरवापराबरोबरच रोखीने चालणाºया दोन नंबरच्या व्यापारासाठी होत होता. नोटाबंदीनंतरही नोटा बदलून मिळाल्याने हा व्यापार सुरूच राहिला आहे. त्यापाठोपाठ जीएसटीमधील संगणक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लागू केलेल्या अनेक तुरतुदींमुळे या दोन नंबरच्या रोखीच्या व्यापारावर बंधन आले.

ही रोखीने चालणारी दोन नंबरच्या व्यापारातील साखळी बहुतांशी बंद झाल्यामुळे व हा पैसा कपाटबंद झाल्याने प्रत्येक ठिकाणच्या उद्योग व व्यापारावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर देशभरातील उत्पादन क्षेत्रे मंदीमुळे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.उद्योग क्षेत्राला गती देण्यासाठी ‘अ‍ॅमनेस्टी स्कीम’ लागू करावी व काळा पैसा जाहीर करून तो उद्योग-व्यापारामध्ये वापरण्याची संधी द्यावी, असेही तारळेकर यावेळी म्हणाले.

काय आहे अ‍ॅमनेस्टी स्कीम...केंद्र शासनाने यापूर्वी काळा व बेहिशेबी पैसा ठराविक टक्के आयकर भरून पांढरा करण्याची योजना सुरू केली होती. त्या योजनेला सरकारने ‘अ‍ॅमनेस्टी स्कीम’ असे नाव दिले होते. सरकारने ही योजना सुरू केल्यास मरगळलेला व्यापार व अर्थव्यवस्थेला गती मिळणार असल्याचे किरण तारळेकर म्हणाले.

टॅग्स :SangliसांगलीMONEYपैसाblack moneyब्लॅक मनी