शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी-सोलापूर महामार्गालगत जमिनीला आला ‘भाव’, व्यवसायासाठी अतिक्रमणे फोफावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2024 14:48 IST

अतिक्रमणामुळे विस्तारीकरणात अडथळे

सांगली : रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर व्यावसायिकांनीही आपले बस्तान बसवायला सुरुवात केली आहे. रस्त्याच्या दुतर्फा व्यापारी उदीम वाढू लागल्याने जमिनींना सोन्याचा भाव आला आहे. त्यातून अतिक्रमणेही फोफावू लागली आहेत. ती तातडीने काढून घेण्याचे आदेश महामार्ग प्राधिकरणाने दिले आहेत.महामार्गाच्या दुतर्फा जणू पैशांचे मळे फुलू लागले आहेत. मिरज ते सोलापूरदरम्यान ठिकठिकाणी हॉटेल्स, लॉजिंग, चहा टपऱ्या, गॅरेज आदी व्यवसाय सुरू झाले आहेत. याचा लाभ उठविण्यासाठी लगतच्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी भाडेपट्ट्याने देण्यास सुरुवात केली आहे. जमिनीच्या रुंदीवर भाड्याचा दर ठरत आहे. मागे शेतात मात्र कितीही अंतरापर्यंत वापर करता येऊ शकतो, पण भाडेपट्ट्याचे भाव भलतेच चढे आहेत. त्यामुळे अतिक्रमणेही फोफावू लागली आहेत.महामार्गाचे काँक्रिटीकरण संपल्यानंतरही दोन्ही बाजूंना काही अंतरापर्यंत महामार्ग प्राधिकरणाची हद्द आहे. तेथे वाहतुकीचा रस्ता नसला, तरी सुरक्षिततेसाठी जागा ठेवण्यात आली आहे. याच ठिकाणी अतिक्रमणे होत असल्याचे आढळले आहे. विशेषत: प्राधिकरणाच्या सोलापूर कार्यालयाच्या अधिकार क्षेत्रामधील हद्दीत लगतच्या मिळकतधारकांनी अनधिकृतपणे अतिक्रमण केले असल्याचे प्राधिकरणाच्या निदर्शनास आले आहे. कच्च्या स्वरूपाची बांधकामेही केली आहेत. ही अतिक्रमणे स्वखर्चाने काढून घ्यावीत, अशी नोटीस प्राधिकरणाने बजावली आहे.

अतिक्रमणामुळे विस्तारीकरणात अडथळे

राष्ट्रीय महामार्ग नियंत्रण (जमीन आणि वाहतूक) अधिनियमानुसार नोटिसांची कार्यवाही करण्यात आली आहे. नोटिसीत म्हटले आहे की, या अतिक्रमणामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ मधील बोरगाव ते वाटंबरे सेक्शनमध्ये रस्ता विस्तारीकरणाच्या कामात अडथळे येत आहेत. रस्त्याच्या मध्यापासून उजव्या व डाव्या बाजूस रस्त्याच्या हद्दीपर्यंत अनधिकृत अतिक्रमण व विनापरवाना बांधकाम केले आहे. ते स्वखर्चाने त्वरित काढून घ्यावे.

मिळकतधारकांनी अतिक्रमण काढून घेतले नाही, तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सोलापूर विभागातर्फे हटविण्यात येईल. त्याचा खर्च व दंड त्यांच्याकडून वसूल करण्यात येईल. - एस. एस. कदम, उपमहासंचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सोलापूर विभाग.

टॅग्स :Sangliसांगलीhighwayमहामार्ग