शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

जिवंत नागपूजेस परवानगी द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 11:45 PM

जिवंत नागपूजेस परवानगी द्यावी

लोकमत न्यूज नेटवर्कशिराळा : शिराळा शहरास नागपंचमीची हजारो वर्षांची परंपरा असून, येथील जनतेची श्रध्दा, भक्ती याचा विचार करून येथे जिवंत नागपूजेस परवानगी शासनाने खास बाब म्हणून द्यावी, असा महत्त्वपूर्ण ठराव शिराळा नगरपंचायतीच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत सर्व नगरसेवकांनी एकमताने केला. याचबरोबर नगरपंचायतीसाठी प्रशासकीय इमारत, स्ट्रिट लाईट, क्रीडांगण, नाट्यगृह आदी विकास कामांचे ठराव मंजूर करण्यात आले.मंगळवारी नगरपंचायत कार्यालयाच्या सभागृहात नगराध्यक्षा सुनंदा सोनटक्के यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. यावेळी नगराध्यक्षांसह उपनगराध्यक्ष कीर्तीकुमार पाटील, अभिजित नाईक, संजय हिरवडेकर, अ‍ॅड. नेहा सूर्यवंशी, उत्तम डांगे, केदार नलवडे हे सदस्य विविध प्रश्नांवर आक्रमक होते.बैठकीत प्रामुख्याने नागरी दलित वस्तीमध्ये ५७.८३ लाखांच्या कामांची निवड करणे, पाणी पुरवठा योजनेस लागणाऱ्या विद्युत मोटारी दुरूस्ती व खरेदी करणे, जिल्हा परिषद शाळा नं. २ ची इमारत अग्निशामक केंद्रासाठी, तर जि. प. शाळा नं. १ ची जागा नगरपंचायत इमारतीसाठी देण्याची मागणी करावी. नाग स्टेडियम येथे क्रीडांगण तसेच त्याच्याशेजारील जागेमध्ये नाट्यगृहासाठी जागा मागणी करण्याचा ठराव करण्यात आला. प्रामुख्याने शिराळा शहरातील घनकचरा व्यवस्थापन, शौचालय बांधणे व दुरूस्ती करणे याबाबत ठराव करण्यात आले. तहसील कार्यालय नवीन इमारतीत जाणार असल्याने जुने तहसील कार्यालय नगरपंचायत कार्यालयासाठी द्यावे, असाही ठराव करण्यात आला. यावेळी आयत्या विषयावर चर्चा करताना शहरामध्ये ज्या खासगी नळ कनेक्शनला चाव्या नाहीत, त्या बसविण्याबद्दल नोटीस बजावावी, तसेच चाव्या न बसविल्यास संबंधितांवर कारवाई अथवा दंड करावा, अशी मागणी अ‍ॅड. सूर्यवंशी यांनी केली. याचबरोबर केदार नलवडे यांनी, नगरपंचायतीमार्फत देण्यात येणारे विविध दाखले, उतारे आदीबाबतचे दर फलकाचे डिजिटल फलक लावावेत, नगरपंचायतीस असणारी सार्वजनिक बांधकाम यंत्रणा बदलू नये, असा ठराव मांडला.ही पहिलीच सभा असल्याने सर्व सदस्यांमध्ये मोठा उत्साह होता. शहराचा विकास, नागरी सुविधा योग्य मिळाव्यात म्हणून प्रत्येकजण कोणती विकास कामे कशी करावीत याबाबत सूचना करीत होता. काहीवेळा एखाद्या विषयावर विरोधक तसेच सत्ताधारी आक्रमकही होत होते. मात्र नगराध्यक्षा सोनटक्के विषयपत्रिकेतील विषय कसे घेतले, कशाप्रकारे प्रत्यक्ष पाहणी केली, याबाबत योग्य उत्तरे देत होत्या. महिला सदस्यांसाठी सर्व चर्चेत सहभागी होत होत्या.यावेळी विषय वाचन मुख्याधिकारी अशोक कुंभार यांनी केले. याप्रसंगी गौतम पोटे, राजश्री यादव, सुनीता निकम, प्रतिभा पवार, सीमा कदम, अर्चना शेटे, वैभव गायकवाड, आशाताई कांबळे, विद्याप्रतापसिंह नाईक, सुजाता इंगवले, मोहन जिरंगे, विजय दळवी हे नगरसेवक उपस्थित होते.यावेळी ग्रामपंचायतीमध्ये अल्प पगारावर काम करणाऱ्या कर्मचारी, सफाई कामगार, पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी यांच्या वेतनामध्ये वाढ करण्याचा ठराव झाला. शिवाजीराव देशमुख, माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्याबरोबर आमदार शिवाजीराव नाईक यांचेही छायाचित्र सभागृहात लावण्याची मागणी भाजप नगरसेवकांनी केली.नगरपंचायतीची इमारत, अग्निशमन दल, स्ट्रिट लाईट, क्रीडांगण, नाट्यगृह, स्मशानभूमीत गॅस दाहिनी बसविणे याबाबत प्रमुख ठराव करण्यात आले. तसेच नागपंचमीदिवशी डॉल्बी, बेंजो, बँड आदी व्यावसायिकांवर खोट्या केसीस दाखल झाल्या आहेत. त्यामुळे अनेक युवकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. या विषयावरही चर्चा झाली.