जयंत दारिद्र्य निर्मूलनच्यावतीने विद्यार्थ्यांना सायकल वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:39 IST2021-02-26T04:39:03+5:302021-02-26T04:39:03+5:30

आष्टा येथील गरजू विद्यार्थ्यांना राजारामबापू बॅँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील यांच्याहस्ते सायकल वाटप करण्यात आले. यावेळी डॉ. एन. टी. ...

Allotment of bicycles to students on behalf of Jayant Poverty Alleviation | जयंत दारिद्र्य निर्मूलनच्यावतीने विद्यार्थ्यांना सायकल वाटप

जयंत दारिद्र्य निर्मूलनच्यावतीने विद्यार्थ्यांना सायकल वाटप

आष्टा येथील गरजू विद्यार्थ्यांना राजारामबापू बॅँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील यांच्याहस्ते सायकल वाटप करण्यात आले. यावेळी डॉ. एन. टी. घट्टे, विराज शिंदे, संग्राम फडतरे, राजाराम जाखलेकर, नियाजुलहक नायकवडी, राहुल पाटील, शिवाजी चोरमुले, सतीश माळी उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

आष्टा : जयंत दारिद्र्य निर्मूलन व इस्लामपूर येथील डॉ. एन. टी. घट्टे ट्रस्टच्यावतीने वाळवा तालुक्यातील १०० गरजू विद्यार्थ्यांना सायकल भेट देण्यात आली. आष्टा येथील बापूसाहेब शिंदे नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रांगणात आष्टा परिसरातील विद्यार्थ्यांना सायकल भेट देण्यात आली.

यावेळी राजारामबापू बँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील, राजारामबापू कारखान्याचे संचालक विराज शिंदे, संस्थेचे अध्यक्ष राजाराम जाखलेकर, राहुल पाटील, आष्टा शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रकाश रुकडे, राजारामबापू दूध संघाचे संचालक संग्राम फडतरे, आष्टा शहर युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष शिवाजी चोरमुले, सतीश माळी, एन. डी. कुलकर्णी, जगन्नाथ बसुगडे उपस्थित होते.

Web Title: Allotment of bicycles to students on behalf of Jayant Poverty Alleviation