साखराळे येथे बांधकाम कामगारांना सुरक्षासंच वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:22 IST2020-12-23T04:22:53+5:302020-12-23T04:22:53+5:30

इस्लामपूर : साखराळे (ता. वाळवा) येथे वाळवा तालुक्यातील एक हजार बांधकाम कामगारांना अत्यावश्यक सुरक्षा संचाचे वाटप करण्यात आले. हे ...

Allocation of safety kits to construction workers at Sakharale | साखराळे येथे बांधकाम कामगारांना सुरक्षासंच वाटप

साखराळे येथे बांधकाम कामगारांना सुरक्षासंच वाटप

इस्लामपूर : साखराळे (ता. वाळवा) येथे वाळवा तालुक्यातील एक हजार बांधकाम कामगारांना अत्यावश्यक सुरक्षा संचाचे वाटप करण्यात आले. हे वाटप रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेश कार्याध्यक्ष सागर खोत यांच्याहस्ते व बहुजन नेते संस्थापक राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघ संदीप पाटोळे यांच्या प्रयत्नातून झाले.

हे साहित्य कीट महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाकडे नोंदणीकृत असणाऱ्या कामगारांना देण्यात आले. यावेळी राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघ प्रदेशाध्यक्ष सलीम सय्यद, मिलिंद म्हात्रे, आरपीआय तालुकाध्यक्ष सुधीर कांबळे, साखराळे ग्रा. पं. सदस्य धनाजी पाटील, दत्तात्रय पाटील, ओंकार देशमुख, लालासाहेब धुमाळ, राजेंद्र सूर्यवंशी उपस्थित होते.

फोटो - २२११२०२०-आयएसएलएम-साखराळे न्यूज

ओळ साखराळे (ता. वाळवा) येथे बांधकाम कामगारांना अत्यावश्यक सुरक्षा संचाचे वाटप सागर खोत यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी संदीप पाटोळे, सलीम सय्यद, मिलिंद म्हात्रे, सुधीर कांबळे, धनाजी पाटील, दत्तात्रय पाटील, ओंकार देशमुख उपस्थित होते.

Web Title: Allocation of safety kits to construction workers at Sakharale