शिराळा तालुक्यातील सर्व यात्रा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:27 IST2021-04-02T04:27:15+5:302021-04-02T04:27:15+5:30
शिराळा : तालुक्यात सध्या होणाऱ्या सर्व यात्रा भरवू नये, यासाठी जनजागृती करावी आणि लसीकरणाचा वेग वाढवावा, अशा सूचना तहसीलदार ...

शिराळा तालुक्यातील सर्व यात्रा रद्द
शिराळा : तालुक्यात सध्या होणाऱ्या सर्व यात्रा भरवू नये, यासाठी जनजागृती करावी आणि लसीकरणाचा वेग वाढवावा, अशा सूचना तहसीलदार गणेश शिंदे यांनी दिल्या अधिकाऱ्यांना दिल्या.
शिराळा तहसीलदार कार्यालयात यात्रा रद्द करणे, लसीकरण वाढविण्यासाठी सरपंच, ग्रामसेवक, तलाठी यांची गुरुवारी बैठक झाली. यावेळी तहसीलदार गणेश शिंदे बोलत होते. यावेळी गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल, पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
तहसीलदार शिंदे म्हणाले की, सद्या तालुक्यात यात्रा सुरू होत आहेत. कोरोनाचा वाढता प्रसार पाहता, या सर्व यात्रा भरवू नयेत. तसेच ग्रामसेवक, गावकामगार तलाठी, ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी याबाबत जनजागृती करावी. मुंबईसह अन्य शहरातून येणाऱ्या गावकऱ्यांना गावाकडे न येण्याबद्दल विनंती करावी.
आता कोरोना प्रतिबंधक लसीकरण ही ४५ वर्षावरील सर्वांसाठी करण्याचे सुरू झाले आहे.
उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रातही लसीकरण करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे लसीकरण करण्यासाठी नागरिकांच्यामध्ये जनजागृती करून लसीकरणाचा वेग वाढवावा. ज्याठिकाणी कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तेथे विलगीकरण, औषधोपचार, संपर्क याबाबत दक्षता घ्या, असे सांगितले.
यावेळी नायब तहसीलदार सचिन कोकाटे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी अरविंद माने, योगेश पाटील, तालुक्यातील सरपंच, ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामसेवक, गावकामगार तलाठी आदी उपस्थित होते.