शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: हिप्परगीचे दरवाजे बंद करताच राजापूर बंधारा बुडाला, कृष्णा महापूर नियंत्रण समितीच्या तक्रारीनंतर दरवाजे उघडले

By अशोक डोंबाळे | Updated: June 18, 2025 19:48 IST

कृष्णा नदीतील पाणी ओसरण्यास सुरुवात

अशोक डोंबाळेसांगली : कृष्णा नदीवरील कर्नाटकमधील हिप्परगी धरणाचे दरवाजे बंद केल्यानंतर त्याची फुग शिरोळपर्यंत आली आहे. राजापूर बंधाराही बुडाला आहे. ही बाब कृष्णा महापूर नियंत्रण समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पाटबंधारे विभागाकडे तक्रार केली होती. त्यानंतर बुधवारी हिप्परगी धरणाचे सर्व दरवाजे उघडले असून, कृष्णा नदीची पाणीपातळी शिरोळपर्यंत कमी होऊ लागली आहे, अशी माहिती कृष्णा महापूर नियंत्रण समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील यांनी बुधवारी पत्रकारांना दिली.सर्जेराव पाटील म्हणाले, कृष्णा, वारणा व पंचगंगा या नद्या सध्या दुथडी भरून वाहत आहेत. पाऊस अपेक्षेपेक्षा लवकर आल्याने व जास्त पडल्यामुळे नदीपात्र भरून वाहत आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आबिटकर यांच्यासोबत जिल्हाधिकारी यांनी जाहीर केले होते. कोणत्याही परिस्थितीत केंद्रीय जल आयोगाच्या नियमाप्रमाणे अलमट्टी आणि हिप्परगी पाणीसाठा ठेवतील त्यावर आमचे लक्ष आहे. परंतु, १५ जूनपासून ही उंची अलमट्टीने पार केली असून, याकडे प्रशासनाचे का लक्ष नाही? वास्तविक, प्रशासनाने यांना खडसावून सांगितले पाहिजे. पावसाच्या सुरुवातीलाच पाणी अडवणे मागील गावांना धोकादायक आहे. हे माहीत असूनसुद्धा अलमट्टी आणि हिप्परगी वेळोवेळी या नियमांचे पालन करीत नाही. हिप्परगी धरणाचे दरवाजे पावसाळ्यात खुले ठेवायचे असतानाही ते बंद करत आहेत. मंगळवारपर्यंत धरणाचे दरवाजे बंद असल्यामुळे कृष्णा नदीतील पाण्याची फुग शिरोळ तालुक्यातील नरसोबावाडीपर्यंत आली होती. राजापूर बंधारा पाण्याखाली बुडाला आहे. तसेच सांगली बंधाराही पाण्याखाली गेला आहे. याबाबत सांगली व कोल्हापूर पाटबंधारे विभागाकडे केंद्रीय जल आयोगांना लेखी तक्रार कृष्णा महापूर समितीने केली आहे. त्यानंतर आज, बुधवारी हिप्परगी धरणाचे दरवाजे उघडले असून, कृष्णा नदीची शिरोळपर्यंतची पाणीपातळी उतरत आहे.