सातत्यपूर्ण प्रयत्नांतूनच विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:19 IST2021-06-03T04:19:35+5:302021-06-03T04:19:35+5:30
भिलवडी : आजचे युग हे आव्हानात्मक युग आहे. यामध्ये ध्येय्याधिष्टीत विद्यार्थीच टिकतील. स्वप्रयत्न व सातत्यपूर्ण कष्टातूनच विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास ...

सातत्यपूर्ण प्रयत्नांतूनच विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास शक्य
भिलवडी : आजचे युग हे आव्हानात्मक युग आहे. यामध्ये ध्येय्याधिष्टीत विद्यार्थीच टिकतील. स्वप्रयत्न व सातत्यपूर्ण कष्टातूनच विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास शक्य आहे, असे प्रतिपादन डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डॉ. जी. कणसे यांनी केले.
कृष्णाकाठ सोशल फाऊंडेशन, भिलवडीतर्फे आयोजित ‘ग्रेट भेट’ या लाईव्ह कार्यक्रमामध्ये डॉ. कणसे बोलत होते. कृष्णा काठावरील युवाशक्तीचा विधायक कार्यासाठी वापर करून आपल्या भागाचा सर्वांगिण विकास साधणे, या उद्देशाने ‘कृष्णाकाठ सोशल फाऊंडेशन, भिलवडी - सांगली’ या उपक्रमाचे आयोजन केले आहे.
विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या अनुभवाची प्रेरणा मिळावी व मार्गदर्शन घडवून आणण्याच्या उद्देशाने ‘ग्रेट भेट’ या ऑनलाईन उपक्रमामध्ये शैक्षणिक क्षेत्रातील उपक्रमशील प्राचार्य डॉ. कणसे यांची मुलाखत निवेदक विठ्ठल मोहिते यांनी घेतली होती.
संस्थेचे संचालक शरद जाधव यांनी प्रास्ताविक केले तर ‘कृष्णाकाठ’चे अध्यक्ष अमोल वंडे यांनी आभार मानले.