जत तालुक्याचा सर्वांगीण विकास करणार : विलासराव जगताप
By Admin | Updated: November 9, 2014 23:37 IST2014-11-09T22:57:54+5:302014-11-09T23:37:33+5:30
अशी ग्वाही भाजपचे आमदार विलासराव जगताप

जत तालुक्याचा सर्वांगीण विकास करणार : विलासराव जगताप
शेगाव : कोणत्याही गावातील सार्वजनिक विकास कामासाठी गट-तट, जात-पात याचा विचार न करता आपल्याला तालुक्याचा सर्वांगीण विकास करायचा आहे, त्यामुळे याकरिता पाठपुरावा करून विकास कामे मार्गी लावू, अशी ग्वाही भाजपचे आमदार विलासराव जगताप यांनी दिली. शेगाव, वाळेखिंडी, बेवनूर, आवंढी, बनाळी, वायफळ, काशिलिंगवाडी, बागलवाडी या गावात आयोजित आभार दौऱ्यात आ. जगताप बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सांगली बाजार समितीचे माजी सभापती सुरेश शिंदे, माजी सभापती प्रकाश जमदाडे, अॅड. प्रभाकर जाधव उपस्थित होते.
आ. जगताप म्हणाले, ज्यांनी मतदान केले, त्यांचा आभारी आहे व ज्यांनी नाही केले त्यांचाही मी आभारी आहे. कारण मी आता जनतेचा आमदार असून, दुष्काळी तालुक्याचे नेतृत्व करण्याची जबाबदारी माझ्यावर आली आहे. दुष्काळी जनतेशी इमान राखून काम करेन. माझ्याकडून काही चूक झाल्यास त्याचा जाब विचारावा, असे आवाहनही जगताप यांनी केले.
यावेळी माणिक वाघमोडे, तुकाराम नाईक, माजी सरपंच पांडुरंग शिंदे, भीमराव शिंदे, एन. डी. शिंदे, सरपंच संभाजी शिंदे, भानुदास शिंदे, यु. डी. शिंदे, भाऊसाहेब शिंदे, विलास शिंदे, लक्ष्मण बोराडे, सचिन बोराडे, पं. स. सदस्या आशाताई नरळे, महादेव साळुंखे उपस्थित होते. (वार्ताहर)