नवेखेडमधील सर्व प्रकल्प मार्गी लावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:19 IST2021-02-05T07:19:56+5:302021-02-05T07:19:56+5:30

बोरगाव : शैक्षणिक दर्जा व गुणवत्ता वाढविण्यासाठी ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांतील इमारती व परिसर सुशोभित करायला हवेत. नवेखेड ...

All the projects in Navekhed will be sorted out | नवेखेडमधील सर्व प्रकल्प मार्गी लावणार

नवेखेडमधील सर्व प्रकल्प मार्गी लावणार

बोरगाव : शैक्षणिक दर्जा व गुणवत्ता वाढविण्यासाठी ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांतील इमारती व परिसर सुशोभित करायला हवेत. नवेखेड गावच्या विकासासाठी जयंत पाटील यांच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करून गावातील भविष्यात सर्व प्रकल्प मार्गी लावू, अशी ग्वाही युवा नेते प्रतीक पाटील यांनी दिली.

नवेखेड (ता. वाळवा) येथील विविध विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. प्रतीक पाटील याच्या हस्ते चाळीस लाख रुपये खर्चाच्या जिल्हा परिषद शाळा इमारत बांधकामाचे भूमिपूजन, गावातील अंतर्गत रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

प्रतिक पाटील यांची सांगली जिल्हा व्हॉलीबॉल संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी त्यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा ग्रामाथांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी सरपंच प्रदीप चव्हाण, उपसरपंच प्रकाश चव्हाण, डी. बी. पाटील, मोहन जाधव, राजेंद्र पाटील, संताजी गावडे, बालाजी निकम, जयवंत पाटील, महालिंग जंगम उपस्थित होते.

फोटो-२४बरोगाव१

फोटो ओळी : नवेखेड (ता. वाळवा) येथे प्रतीक पाटील यांच्याहस्ते विविध विकासकामांचे भुमीपुजन करण्यात आले. यावेळी प्रदीप चव्हाण, बालाजी निकम उपस्थित होते.

Web Title: All the projects in Navekhed will be sorted out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.