शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
3
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
4
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
5
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
6
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
7
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
8
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
9
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
10
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
11
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
12
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
13
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
14
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
15
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
16
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
17
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
18
भर वाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
19
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
20
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
Daily Top 2Weekly Top 5

सर्वच पक्षांना अखेर उमेदवार मिळाले!

By admin | Updated: September 28, 2014 00:44 IST

प्रकाश शेंडगे राष्ट्रवादीतून : भाजपचे तेली, ‘स्वाभिमानी’चे खराडे यांना शिवसेनेचे तिकीट

सांगली : पक्षबदलाचे उधाणलेले तुफान... उमेदवारीतील गोंधळ... गुंता सोडविण्यासाठी नेत्यांचे रात्रभर जागरण अशा वातावरणात विचित्र घडामोडींनी अखेर आज, शनिवारी सर्वच पक्षांना उमेदवार मिळाले! भाजपने पत्ता कट केलेले आमदार प्रकाश शेंडगे यांना राष्ट्रवादीने जतमधून उमेदवारी दिली. मिरजेतून सी. आर. सांगलीकरांची उमेदवारी रात्री साडेबाराला बदलून पुन्हा सिद्धार्थ जाधव यांना देण्यात आल्याचे स्पष्ट झाले, तर मिरजेतूनच राष्ट्रवादीने कॉँग्रेसमधील नाराज बाळासाहेब होनमोरे यांना तिकीट दिले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते महेश खराडे यांनी शिवसेनेत प्रवेश करून तासगाव-कवठेमहांकाळची उमेदवारी मिळविली. जिल्ह्यातील आठ मतदारसंघां-साठी आज, शनिवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी घाईगडबडीत सर्वच पक्षांचे उमेदवार निश्चित झाले. पक्षाचा एबी फॉर्म देऊन अधिकृत याद्याही जाहीर करण्यात आल्या. यासाठी नेत्यांसह पदाधिकाऱ्यांनी रात्र जागवली. या आठही मतदारसंघांतील लढतीचे चित्र अस्पष्ट होते. त्यातच आघाडी आणि महायुती तुटल्यानंतर उमेदवार शोधण्याची वेळ सर्वच पक्षांवर आली. काल, शुक्रवारी या घडामोडींना वेग आला होता. आजही तीच स्थिती राहिली. एकमेकांचे उमेदवार पळविण्यापासून मतविभागणीचे गणित मांडत काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना आणि मनसेने अधिकृत उमेदवारांची यादी शनिवारी दुपारी प्रसिद्ध केली. जतचे भाजपचे आमदार प्रकाश शेंडगे यांचे तिकीट कापले गेल्यानंतर राष्ट्रवादीने त्यांना उमेदवारी दिली. मिरजेतील राष्ट्रवादीच्या जागेबाबत पहाटेपर्यंत खलबते सुरू होती. काँग्रेसमध्ये तर वाद निर्माण झाला. जाधव यांचे नाव दोन दिवसांपूर्वी निश्चित झाल्याचे समजल्यानंतर काहींनी सी. आर. सांगलीकर यांच्यासाठी ताकद लावली होती. शुक्रवारी सायंकाळी पुन्हा सांगलीकर यांना तिकीट देण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या समर्थकांनी फटाकेही उडवले. मात्र, रात्री साडेबाराच्या सुमारास काँग्रेसची यादी जाहीर झाली. त्यातून सिद्धार्थ जाधव यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे स्पष्ट झाले. शुक्रवारी उमेदवारी नाकारली गेल्याचे कळाल्यानंतर जाधव यांनी राष्ट्रवादीचे कार्यालय गाठले होते. त्यांच्या नावावर विचार सुरू होता. मात्र, रात्री राष्ट्रवादीने सकाळी कॉँग्रेसमधील नाराज बाळासाहेब होनमोरे यांना तिकीट जाहीर केले. राष्ट्रवादीच्या सांगलीतील जागेवर माजी आमदार दिनकर पाटील, खादी व ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष सुरेश पाटील, माजी महापौर इद्रिस नायकवडी, मैनुद्दीन बागवान प्रयत्नशील होते. रात्रभराच्या चर्चेनंतर सुरेश पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे दिनकर पाटील समर्थक नाराज झाले. पलूस-कडेगावमधून राष्ट्रवादीने कुंडलच्या माजी जिल्हा परिषद सदस्या सुरेखा लाड यांना उमेदवारी दिली.शिवसेनेच्या गळाला स्वाभिमानी शेतकरी संघटना, भाजपचे मासे लागले. शिवसेनेने तासगाव-कवठेमहांकाळमधून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते महेश खराडे यांना, तर जतमधून भाजपचे संगमेश तेली यांना उमेदवारी दिली. राष्ट्रवादीतून शिवसेनेत दाखल झालेले जि. प. चे सदस्य भीमराव माने यांना इस्लामपुरातून ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्याविरोधात मैदानात उतरवण्यात आले.