शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
2
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
3
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
4
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
5
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
6
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
7
सात जन्माच्या साथीदारानेच केली क्रूरता! पतीमुळे ४ वर्षांच्या चिमुकल्याची आई ९ महिने तडफडत राहिली.. 
8
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
9
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
10
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
11
सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
12
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय; रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला भारतात मोठी गती मिळणार
13
मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार की काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम...
14
टीम इंडियाचा दबदबा संपत चाललाय, काही जण तर..; लाजिरवाण्या पराभवानंतर हर्षा भोगलेंनी सुनावलं
15
पंडित देशमुख खुनाचा मुद्दा २० वर्षांनंतर प्रचारात, मोहोळच्या देशमुखांसोबत काय घडलं होतं?
16
'थोडी वाट पाहा, फोन करतो', मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेदरम्यान राहुल गांधींचा डीके शिवकुमार यांना मेसेज
17
एकनाथ शिंदे सत्ता मिळवून दिघे साहेबांचे स्वप्न साकारणार की गणेश नाईक पुन्हा दूर ठेवणार?
18
IND vs SA : गौतम गंभीरचा राजीनामा द्यायला नकार! म्हणाला, "मी जिंकवलेल्या मालिका आठवा..!!"
19
PF खातेधारकांसाठी मोठी बातमी! पेन्शन, पीएफ आणि ईपीएसच्या नियमांमध्ये मोठे बदल
20
सूरज चव्हाणचं प्री-वेडिंग फोटोशूट; होणाऱ्या पत्नीसोबत वेस्टर्न लूकमध्ये दिल्या रोमँटिक पोझ
Daily Top 2Weekly Top 5

Sangli-Local Body Election: तासगावात निर्णायक ठरणार नाराजीचा पॅटर्न, अजित पवार गट चर्चेत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 17:48 IST

नाराजी कोणाच्या पथ्यावर पडणार याची उत्सुकता

दत्ता पाटीलतासगाव : तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत यावेळी सर्वच पक्ष आणि गटांना नाराजीचा सामना करावा लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. विशेषता: शरद पवार गटातून नाराज झालेल्या अजय पाटील यांनी बंडाचा झेंडा घेऊन थेट अजित पवार गटाच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार उतरवला आहे.

उमेदवारी डावलल्यामुळे संजयकाका गटाशी सलगी असणारे काँग्रेसचे महादेव पाटील नाराज आहेत; तर भाजपच्या निवडणूक प्रक्रियेतून बाहेर निघालेले संदीप गिड्डे पाटील देखील नाराज आहेत. अजय पाटील यांचा अपवाद वगळता इतरांनी अद्याप भूमिका स्पष्ट केली नाही. मात्र या वेळच्या निवडणुकीत नाराजीचा पॅटर्न निवडणूक निकालात निर्णायक ठरणार आहे, हे निश्चित.

वाचा: जयंत पाटील यांनी ईश्वरपूर मतदारसंघात तळ ठोकला, शिंदेसेनेविरुध्द मोर्चेबांधणी आमदार रोहित पाटील यांच्या गटात उमेदवारी डावलल्यामुळे पहिल्या फळीतील काही नेते नाराज झाले. अनेकांची नाराजी दूर झाली, मात्र अजय पाटील यांनी थेट पक्ष बदलून नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात बंडाचे निशाण उभारले.दुसरीकडे, माजी खासदार संजय पाटील यांच्याशी सलगी असलेले काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील यांच्या पत्नीची उमेदवारी डावलण्यात आली. ते नाराजी दाखवून देणार का, हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र एकंदरीत राजकीय चित्र पाहिल्यानंतर लवकरच महादेव पाटील राजकीय व्यासपीठावर दिसतील, अशी चर्चा आहे.तर भाजपने यावेळी माजी खासदार संजय काकांना वगळून, पहिल्यांदाच तालुकाध्यक्ष स्वप्नील पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष पदासह सर्व जागांवर उमेदवार उभे केले आहेत. निवडणुकीच्या प्रक्रियेत सुरुवातीच्या टप्प्यात किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीप गिड्डे पाटील हे देखील सहभागी होते. मात्र नंतरच्या काळात पक्षांतर्गत घडामोडीनंतर संदीप गिड्डे पाटील निवडणुकीच्या प्रक्रियेपासून दूर झाल्याचे दिसून आले. तर तालुकाध्यक्ष स्वप्नील पाटील यांनी एकहाती सर्व उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. त्यामुळे गिड्डे पाटील यांच्या भूमिकेचा देखील अद्याप सस्पेन्स कायम आहे.अजित पवार गट चर्चेत विधानसभा निवडणूक अजित पवारांच्या गटातून लढवलेल्या माजी खासदार संजय काकांनी अजित पवार गटासोबतून हरकत घेतली. त्यानंतर या निवडणुकीत अजित पवारांच्या गटाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र शरद पवार गटात नाराज झालेल्या अजय पाटील यांनी अजित पवार गटात प्रवेश केल्यामुळे तासगाव शहरात अजित पवार गट पुन्हा चर्चेत आला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Tasgaon Local Elections: Discontent Key; Ajit Pawar Faction in Focus

Web Summary : Tasgaon civic polls see widespread discontent. Ajay Patil's shift to Ajit Pawar's faction is key. Congress and BJP factions also face internal dissent, impacting election dynamics. The final outcome hinges on these disgruntled elements.