शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

'शक्तिपीठ' बाधितांच्या सर्व हरकती फेटाळल्या, सांगलीतील शेतकरी मंगळवारी निकालपत्राची करणार होळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 13:32 IST

शेतकऱ्यांकडून १९५० हरकती

सांगली : शक्तिपीठ महामार्गाबाबत महाराष्ट्र शासनाने काढलेल्या अधिसूचनेला घेण्यात आलेल्या हरकती फेटाळण्यात आल्या आहेत तसे निकाल प्रशासनाने दिले असून प्रत्येक बाधित शेतकऱ्यांना प्रति पाठविल्या आहेत. या निकालपत्राची होळी दि. ९ सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात येणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष उमेश देशमुख यांनी दिली.उमेश देशमुख म्हणाले, शक्तिपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे, या मागणीसाठी गेल्या दीड वर्षांपासून शेतकरी आंदोलन करीत आहेत. सरकारने शेतकऱ्यांचे कोणतेही म्हणणे ऐकून न घेता एकतर्फी निर्णय जाहीर केला आहे. शेतकऱ्यांचा विरोध तीव्र असून देखील सरकारने जमीन अधिग्रहणाचे काम चालूच ठेवले आहे. सरकारने भूसंपादनासाठी केवळ २० हजार कोटी रुपयांची तरतूद करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. हरकती सादर करत असताना शेतकऱ्यांच्या बागायती जमिनी, त्या बागायती करण्याकरिता केलेला खर्च, त्यातून मिळणारे उत्पन्न, पुढील अनेक पिढ्यांचे होणारे नुकसान आदींचा विचार करून शेतकऱ्यांना भरपाई देण्याची गरज आहे. नदीकाठावरील भागात तयार होणारी पूरसदृश्य परिस्थिती या सर्व नुकसानीचे मुद्दे प्रांताधिकारी यांच्यासमोर मांडलेल्या होत्या. त्यांनी यापैकी कोणत्याही बाबींचा विचार न करता या हरकती फेटाळल्या आहेत. याचा निषेध करून दिलेल्या निकालपत्राच्या प्रतीची मंगळवारी (दि.९) सांगलीजिल्हाधिकारी कार्यालयासमोर होळी करण्यात येणार आहे.यावेळी शक्तिपीठ महामार्ग बाधित शेती बचाव कृती समितीचे महेश खराडे, सतीश साखळकर, प्रवीण पाटील, प्रभाकर तोडकर, उमेश एडके, पैलवान विष्णुपंत पाटील, यशवंत हरगुडे, राजाराम माळी, सतीश माळी, अण्णासाहेब जमदाडे, सुनील पवार, अधिकराव शिंदे, रवींद्र माळी, भीमाना खाडे, एकनाथ कोळी, उत्तम शिंदे, रघुनाथ पाटील, विलास पाटील, भाऊसाहेब लांडगे, मुरलीधर निकम, संतोष लोहार, नितीन झांबरे आदी उपस्थित होते.शेतकऱ्यांकडून १९५० हरकतीशक्तिपीठ महामार्ग बाधित जिल्ह्यातील एक हजार ९५० शेतकऱ्यांच्या हरकती दाखल झाल्या होत्या. त्यापैकी बहुतांशी हरकती मोबदला, शक्तिपीठ महामार्ग नको, अशाच आशयाच्या होत्या. मिरज प्रांताधिकारी यांच्याकडून या सर्व हरकती फेटाळल्या आहेत, अशी माहिती उमेश देशमुख यांनी दिली.