महापालिकेच्या सर्वच सभा ऑनलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:19 IST2021-06-29T04:19:11+5:302021-06-29T04:19:11+5:30

सांगली : कोरोना विषाणूचा वाढता धोका लक्षात घेता महापालिकेतील सर्व सभा, बैठका ऑनलाईन पद्धतीनेच घ्याव्यात, अशा सूचना शासनाने दिल्या ...

All the meetings of the corporation are online | महापालिकेच्या सर्वच सभा ऑनलाईन

महापालिकेच्या सर्वच सभा ऑनलाईन

सांगली : कोरोना विषाणूचा वाढता धोका लक्षात घेता महापालिकेतील सर्व सभा, बैठका ऑनलाईन पद्धतीनेच घ्याव्यात, अशा सूचना शासनाने दिल्या आहेत. याबाबतचे एक पत्र राज्याचे अवर सचिव सचिन सहस्रबुद्धे यांनी महापालिका प्रशासनाला पाठविले आहे.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या महासभासह स्थायी समितीच्या सभाही ऑनलाईन पद्धतीनेच सुरू आहेत. गेल्या दीड वर्षापासून एकही महासभा ऑफलाईन झालेली नाही. दरम्यान, कोरोनाचे संकट वाढतच जाईल. यात डेटा आणि डेल्टा पल्स या विषाणूंचीही भर पडली आहे. त्यामुळे शासन अधिक अलर्ट झाले आहे. अवर सचिव सचिन सहस्रबुद्धे यांनी याबाबतचे एक पत्र महापालिकेला पाठविले असून सभा ऑनलाईन घ्याव्यात अशा सूचना दिल्या आहेत. एक महिन्यानंतर कोरोना स्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल असे पत्रामध्ये म्हटले आहे.

Web Title: All the meetings of the corporation are online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.