शासकीय सर्व यंत्रणेने समन्वयाने काम करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:34 IST2021-04-30T04:34:41+5:302021-04-30T04:34:41+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क विटा : जिल्ह्यात सध्या कोरोना संसर्गाचा विळखा अधिक घट्ट होत असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत पोलीस, ...

All government agencies should work in coordination | शासकीय सर्व यंत्रणेने समन्वयाने काम करावे

शासकीय सर्व यंत्रणेने समन्वयाने काम करावे

लोकमत न्यूज नेटवर्क

विटा : जिल्ह्यात सध्या कोरोना संसर्गाचा विळखा अधिक घट्ट होत असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत पोलीस, महसूल, नगरपालिका व आरोग्य प्रशासनाने समन्वयाने काम करावे. शहरात प्रभाग समिती कार्यक्षमपणे काम करेल यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत. गावोगावी असलेल्या ग्राम दक्षता समित्यांच्या कामावर प्रशासनाने विशेष लक्ष ठेवावे, असे आदेश जिल्हा पोलीसप्रमुख दीक्षित गेडाम यांनी दिले.

विटा पोलीस ठाण्यात गुरुवारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी दीक्षित गेडाम बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी संतोष भोर, तहसीलदार ऋषिकेत शेळके, पोलीस उपअधीक्षक अंकुश इंगळे, पोलीस निरीक्षक संतोष डोके, मुख्याधिकारी अतुल पाटील, गटविकास अधिकारी संदीप पवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल लोखंडे, डॉ. अविनाश लोखंडे, पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर उपस्थित होते.

यावेळी पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी स्वागत केले.

प्रांताधिकारी संतोष भोर यांनी खानापूर तालुक्यातील संपूर्ण कोरोना परिस्थिती व करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी जिल्हा पोलीसप्रमुखांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पोलीस बंदोबस्त व नाकाबंदी याची पाहणी केली. जिल्हा पोलीसप्रमुख दीक्षित गेडाम यांनी जे कोरोनाबाधित रुग्ण गृहविलगीकरणात आहेत, ते घरातून बाहेर पडणार नाहीत, याची काळजी घ्या. प्रतिबंधित क्षेत्र करून तेथे कोणी प्रवेश करणार नाहीत व तेथून कोणी बाहेर पडणार नाही याकडे लक्ष द्या, असे सांगून शासनाच्या ब्रेक द चेन नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे अधिकाऱ्यांना या बैठकीत आदेश दिले.

Web Title: All government agencies should work in coordination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.