शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 16:14 IST

कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाच दिवसापासून पाऊस होत असल्याने कोयना धरणामध्ये 74.89 टी. एम. सी. पाणीसाठा आहे. तसेच वारणा धरणातून 28.90 टी. एम. सी. पाणीसाठा असून 900 क्युसेकस व पंचगंगेतील विसर्ग सोडण्यात येणार आहे.

ठळक मुद्देकोयना नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाचा सतर्कतेचा इशारावारणा धरणात 28.89 टी.एम.सी. पाणीसाठा

सांगली : कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाच दिवसापासून पाऊस होत असल्याने कोयना धरणामध्ये 74.89 टी. एम. सी. पाणीसाठा आहे. तसेच वारणा धरणातून 28.90 टी. एम. सी. पाणीसाठा असून 900 क्युसेकस व पंचगंगेतील विसर्ग सोडण्यात येणार आहे.

त्यामुळे धरणातून विसर्ग वाढणार असून कृष्णा नदी पातळीमध्ये सातत्याने वाढ होणार आहे. त्यामुळे नदीकाठाची गावे, वाड्या, वस्त्यामध्ये राहणाऱ्या नागरिकांनी सुरक्षेच्या कारणास्तव नदीपात्रात प्रवेश करू नये. वीज, मोटारी, इंजिने, शेती अवजारे व पशुधन यांच्या सुरक्षेची काळजी घेऊन सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.तसेच सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी यांनी संभाव्य परिस्थिती लक्षात घेता समन्वय ठेवून सतर्क रहावे अशा सूचनाही जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत.

 वारणा धरणात 28.89 टी.एम.सी. पाणीसाठासांगली जिल्ह्यातील वारणा धरणात आज अखेर 28.89 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.आपल्या शेजारील सातारा जिल्ह्यातील कोयना धरणामध्ये 74.89 टी.एम.सी इतका पाणीसाठा असून धरणाची साठवण क्षमता 105.25 टी.एम.सी, धोम धरणात 7.77 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 13.50 टी.एम.सी, कन्हेर धरणात 8.12 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 10.10 टी.एम.सी. आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा धरणात 15.93 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 25.40 व राधानगरी धरणात 8.28 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 8.36 टी.एम.सी.आहे. अलमट्टी धरणात 111.31 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 123 टी.एम.सी. असल्याचे जलसंपदा विभागामार्फत कळविण्यात आले आहे.वारणा धरणातून कालवा व विद्युतगृहाव्दारे 900 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे.

  • कृष्णा पूल कराड 21.8 (45),
  • आयर्विन पूल सांगली 35 (40)
  • अंकली पूल हरिपूर 38.9 (45.11).

 

टॅग्स :DamधरणSangliसांगली