आळसंदला पलुस खरेदी-विक्री संघाची शाखा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:31 IST2021-09-05T04:31:25+5:302021-09-05T04:31:25+5:30
फोटो : आळसंद (ता. खानापूर) येथे पलुस तालुका खरेदी-विक्री संघाच्या आळसंद शाखेचे उद्घाटन वैभव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. ...

आळसंदला पलुस खरेदी-विक्री संघाची शाखा सुरू
फोटो : आळसंद (ता. खानापूर) येथे पलुस तालुका खरेदी-विक्री संघाच्या आळसंद शाखेचे उद्घाटन वैभव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शरद लाड, महावीर शिंदे, इंदुमती जाधव आदी उपस्थित होते.
आळसंद : शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी व्हावा, शेतकऱ्यांना लागणारे बियाणे, खते, औषधे माफक दरात उपलब्ध होऊन त्यांचे जीवनमान उंचवावे, या हेतूने पलुस तालुका खरेदी-विक्री संघाची स्थापना करण्यात आली होती. संघाचे काम चांगल्या प्रकारे सुरू असून, याचा फायदा परिसरातील शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन जि. प. सदस्य शरद लाड यांनी केले.
आळसंद (ता. खानापूर) येथे पलुस तालुका खरेदी-विक्री संघाच्या शाखेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी शरद लाड बोलत होते.
माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, सभापती महावीर शिंदे, पंचायत समिती सदस्य संजय मोहिते, संदीप मुळीक, सरपंच इंदुमती जाधव, शशिकांत अदाटे, पोलीस पाटील गणेश शेटे, शहाजी धनवडे, चंद्रकांत चव्हाण, राहुल साळुंखे, क्रांतीचे उपाध्यक्ष उमेश जोशी, पोपट फडतरे, शशिकांत पाटील, संदीप पवार, अरुण कदम, आत्माराम हरुगडे, प्रदीप पाटील, वैभव पवार, अजित जाधव उपस्थित होते.