शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

जिगरबाजाला विश्वजित यांच्याकडून ‘अक्षय’ऊर्जा

By admin | Updated: May 3, 2017 23:24 IST

आर्थिक मदत : अडीचशे किलोमीटर धावल्याबद्दल कौतुक; सैन्यदलातील भरतीसाठी प्रयत्नांची ग्वाही

प्रताप महाडिक ल्ल कडेगावचिंचणी (ता. कडेगाव) येथील अक्षय बाबासाहेब पाटोळे याच्यासह शिवप्रतिष्ठानच्या १७ जिगरबाज तरुणांचा श्रीशैलम् ते चिंचणी असा सातशे किलोमीटरचा थक्क करणारा प्रवास आणि त्यात एकटा अक्षय टप्प्याटप्प्याने २५१ किलोमीटर धावल्याचे समजताच बुधवारी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांनी अक्षयची भेट घेतली. यावेळी त्यांनी त्याला आर्थिक मदत देऊन सैन्य दलात भरती होईपर्यंत सर्वतोपरी मदतीची ग्वाहीही दिली. यातून या शिवप्रेमी तरुणाला ‘अक्षय ऊर्जा’ मिळाली.‘शिवज्योत घेऊन तो २५१ किलोमीटर धावला..!’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने रविवारच्या अंकात शिवप्रेमी तरुणांचे वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर मंगळवारी सायंकाळी सात वाजता विश्वजित कदम यांनी चिंचणी येथील कार्यकर्त्यांना घेऊन अक्षयची त्याच्या घरीच भेट घेऊन शिवज्योतीच्या प्रवासाबाबत माहिती घेतली. अक्षय एकटा २५१ किलोमीटर टप्प्याटप्प्याने धावल्याबद्दल त्याचे कौतुक केले. यावेळी त्याच्या सहकाऱ्यांनाही शाबासकी दिली. य्अक्षयने सैन्य दलात भरती होऊन देशासाठी लढण्याची इच्छा व्यक्त केली. यावर विश्वजित कदम यांनी अक्षयला २० हजार रुपये रोख दिले. शिवाय सैन्यभरती प्रशिक्षणासाठी सर्वतोपरी आर्थिक मदत करण्याची ग्वाही दिली.अक्षयच्या आई-वडिलांनी आपली व्यथाही कदम यांच्यासमोर मांडली. अक्षयचे आई-वडील, दोन लहान बहिणी आणि आजी असे सहा सदस्यांचे कुटुंब जुन्या मोडकळीस आलेल्या कौलारू घरात राहत आहे. पावसाळ्यात घराची अवस्था बिकट असते. शेतीसाठी जमीन नाही. यामुळे मोलमजुरीशिवाय पर्याय नाही. आर्थिक परिस्थिती बिकट असली तरी, अक्षयचा सैन्य भरतीचा सराव मात्र कायम सुरू आहे. शासनाच्या सर्व निकषास पात्र असतानाही पाटोळे कुटुंबाला अद्याप घरकुल मिळालेले नाही. बारावी विज्ञान चांगल्या गुणांनी पास झाला असतानाही, पुढील शिक्षणासाठी पैसे नाहीत म्हणून अक्षयने शाळा सोडली. हे सांगताना अक्षयची आई भावूक झाली. विश्वजित कदम ही व्यथा ऐकून भावूक झाले. शासनस्तरावर स्वत: प्रयत्न करून घरकुल मंजूर करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. जितेश कदम उपस्थित होते.‘लोकमत’मुळे मदतीचा ओघअक्षयवर समाजातून कौतुकाचा वर्षाव होत आहे आणि मदतीचा ओघही सुरू आहे. सैन्य भरतीचे प्रशिक्षण देणाऱ्या काही संस्थाही मदतीसाठी सरसावल्या आहेत. यासाठी निमित्त ठरले रविवारी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झालेले वृत्त. अनेकजण अक्षयचा मोबाईल नंबर मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु त्याच्याजवळ अद्याप मोबाईल नाही!