शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मैनुद्दीन बागवान यांच्या निवासस्थानी अजितदादांची भेट, मिरज संघर्ष समितीत जाणाऱ्यांना रोखण्याचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 23:53 IST

मिरज : मिरजेत संघर्ष समितीत जाणाºया राष्ट्र वादी नगरसेवकांना रोखण्यासाठी माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. ‘हल्लाबोल’ यात्रेसाठी मिरजेत आलेले माजी उपमुख्यमंत्री

ठळक मुद्दे महापालिका निवडणुकीविषयी चर्चा

सदानंद औंधे ।मिरज : मिरजेत संघर्ष समितीत जाणाºया राष्ट्र वादी नगरसेवकांना रोखण्यासाठी माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. ‘हल्लाबोल’ यात्रेसाठी मिरजेत आलेले माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संघर्ष समितीच्या वाटेवर असलेले राष्ट्र वादीचे नगरसेवक मैनुद्दीन बागवान यांच्या निवासस्थानी भेट दिली. राष्ट्र वादीचे आनंदा देवमाने भाजपच्या वाटेवर असून, कुंपणावर असलेल्या राष्ट्र वादीतील नगरसेवकांना रोखण्यासाठी आ. पाटील मिरजेत तळ ठोकणार आहेत.महापालिका प्रभाग रचनेत मिरजेत कारभारी नगरसेवकांच्या प्रभागांचा विस्तार झाला आहे. थोड्याफार फरकाने सर्वांना पुन्हा संधी मिळणार आहे.

इद्रिस नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली मैनुद्दीन बागवान, जमील बागवान, विवेक कांबळे, शिवाजी दुर्वे, अतहर नायकवडी, अल्लाउद्दीन काझी, निरंजन आवटी, जुबेर चौधरी, महादेव कुरणे, चंद्रकांत हुलवान आदी काँग्रेस, राष्ट्र वादीचे आजी-माजी नगरसेवक एकत्रित आले आहेत. संघर्ष समितीच्या झेंड्याखाली मिरजेतील नगरसेवकांचा दबावगट निर्माण करण्याच्या हालचाली सुरू आहेत. मिरजेत राष्ट्र वादीचे सात नगरसेवक असून, यापैकी आनंदा देवमाने राष्ट्र वादीला रामराम ठोकून भाजपच्या वाटेवर आहेत. मैनुद्दीन बागवान, जमील बागवान, अल्लाउद्दीन काझी, जुबेरचौधरी संघर्ष समितीच्या बैठकांना हजेरी लावत आहेत. यामुळे महापालिका निवडणुकीत राष्ट्र वादीला उमेदवार शोधावे लागणार आहेत.

या पार्श्वभूमीवर आ. पाटील यांनी मिरजेतील कुंपणावर असलेल्या मैनुद्दीन बागवान यांच्यासह अन्य नाराज मंडळींना रोखण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. हल्लाबोल यात्रेसाठी मिरजेत बुधवारी झालेल्या सभेसाठी आनंदा देवमाने व शुभांगी देवमाने वगळता राष्ट्र वादीचे अन्य सहा नगरसेवक उपस्थित होते. राष्ट्र वादीचे नेते अजित पवार यांनी मैनुद्दीन बागवान यांची निवासस्थानी भेट घेतली. अल्लाउद्दीन काझी व मैनुद्दीन बागवान प्रभाग सहामधून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. काझी यांनी बागवान यांच्याविरोधात निवडणूक लढविण्याचा इशारा दिल्याने निवडणुकीपूर्वीच राष्ट्र वादीच्या नगरसेवकांत वादाची ठिणगी पडली आहे. पक्षातील नाराज मंडळींची समजूत काढण्यासाठी जयंत पाटील दि. ८ पासून सांगली-मिरजेत तळ ठोकणार असल्याची माहिती मिळाली.परिस्थिती बदललीराष्ट्र वादी नगरसेवक मैनुद्दीन बागवान मिरज दंगलीतील आरोपी असल्याने तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या कार्यक्रमात त्यांना व्यासपीठावर येण्यास मज्जाव होता. मात्र बदलत्या परिस्थितीत मैनुद्दीन बागवान यांनी पक्ष सोडू नये, यासाठी राष्ट्र वादीचे नेते त्यांची निवासस्थानी जाऊन भेट घेत आहेत.भाजपच्या वाटेवर चौघेसंघर्ष समितीने मिरजेतील काँग्रेस व राष्ट्र वादीतील नगरसेवकांना जाळ्यात ओढले आहे. मात्र संघर्ष समितीतील नगरसेवक सुरेश आवटी, निरंजन आवटी, शिवाजी दुर्वे, आनंदा देवमाने भाजपच्या वाटेवर असून, त्यांची भाजपची उमेदवारी निश्चित झाली असल्याची चर्चा आहे.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणAjit Pawarअजित पवार