अजित सिद्ध आष्ट्याचे नवे पोलीस निरीक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:25 IST2021-03-18T04:25:23+5:302021-03-18T04:25:23+5:30

आष्टा : आष्टा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भानुदास निंबोरे यांची सांगली येथे बदली झाली आहे. नूतन पोलीस निरीक्षक म्हणून ...

Ajit Siddha Ashta's new police inspector | अजित सिद्ध आष्ट्याचे नवे पोलीस निरीक्षक

अजित सिद्ध आष्ट्याचे नवे पोलीस निरीक्षक

आष्टा : आष्टा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भानुदास निंबोरे यांची सांगली येथे बदली झाली आहे. नूतन पोलीस निरीक्षक म्हणून अजित सिद्ध यांनी पदभार स्वीकारला.

अजित सिद्ध यांनी टेक्स्टाईलमध्ये इंजिनीअरिंगची पदवी मिळविली आहे. काही काळ खासगी नोकरी केल्यानंतर २००६ मध्ये त्यांची स्पर्धा परीक्षेतून पाेलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली. ठाणे शहर, पुणे ग्रामीण, गडचिरोली, हायवे ट्रॅफिक, नागपूर शहर, यासह सांगली पोलीस ठाण्यात त्यांनी सेवा बजावली आहे. आष्टा येथे नियुक्ती झाल्यानंतर पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे यांनी पदभार अजित सिद्ध यांच्याकडे सोपवला. यावेळी आष्टा शहर व परिसरातील मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले. आष्टा शहर व परिसरातील गुन्हेगारीला आळा घालून शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन अजित सिद्ध यांनी केले आहे.

फोटो : १७ आष्टा १

ओळ : आष्टा पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक अजित सिद्ध यांचा सत्कार पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे यांनी केला.

Web Title: Ajit Siddha Ashta's new police inspector