ऐतवडे खुर्दला गौरी-गणपतीनिमित्त लोककला स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:27 IST2021-09-18T04:27:54+5:302021-09-18T04:27:54+5:30

जात्यावरील ओव्या, उखाणे, पारंपरिक वेशभूषा, काठवट कना, घागर नाचविणे या वैयक्तिक स्पर्धेमध्ये शालेय विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला. जयदत्त ज्ञानपीठ कोल्हापूरच्या ...

Aitwade Khurdala Gauri-Ganapati Folk Art Competition | ऐतवडे खुर्दला गौरी-गणपतीनिमित्त लोककला स्पर्धा

ऐतवडे खुर्दला गौरी-गणपतीनिमित्त लोककला स्पर्धा

जात्यावरील ओव्या, उखाणे, पारंपरिक वेशभूषा, काठवट कना, घागर नाचविणे या वैयक्तिक स्पर्धेमध्ये शालेय विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला. जयदत्त ज्ञानपीठ कोल्हापूरच्या संस्थापिका डॉ. प्रज्ञा पाटील यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना सन्मानित करण्यात आले. काठवट कना स्पर्धेत प्राची पाटील, संचिता कदम, श्रुतिका पाटील. घागर घुमने स्पर्धेत प्रीती चव्हाण, शर्वरी शेटे, गीतांजली मिसाळकर. पारंपरिक वेशभूषेत लहान गट-आरोही कदम, श्रेया केडगे, गीतांजली चव्हाण. मध्यम गट पारंपरिक वेशभूषा - पूर्वा पवार, स्वरूपा पवार, संचिता कदम, पारंपरिक वेशभूषा मोठा गट : दिशा केडगे, श्रावणी परीट, प्राचीन पाटील यांनी यश संपादन केले.

विभागप्रमुख म्हणून भारती निकम, परीक्षक म्हणून सुनीता पाटील, वैशाली पाटील, स्मिता जमदाडे, ए. पी. पाटील, एस. के. पाटील, एस. एम. पारधी यांनी काम पाहिले. स्पर्धेचे आयोजन जे. आर. शेटे, आय. एस. मुल्ला, मिनाज कुरणे यांनी केले.

Web Title: Aitwade Khurdala Gauri-Ganapati Folk Art Competition