शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
4
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
5
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
6
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
7
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
8
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
9
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
10
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
11
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
12
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
13
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
14
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
15
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
16
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
17
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
18
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
19
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
20
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
Daily Top 2Weekly Top 5

Sangli News: अहिल्यादेवींकडून भारतीय संस्कृतीचे पुनरुज्जीवन : देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 19:00 IST

सांगलीत अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे लोकार्पण, राजकीय विरोधक एकाच व्यासपीठावर

सांगली : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी भारतीय संस्कृतीचे पुनरुज्जीवन केले. मुघल आक्रमणानंतर उद्ध्वस्त झालेली मंदिरे, तीर्थक्षेत्रे नव्याने उभी केली. शौर्य, धर्मप्रियता, प्रशासन, समता आणि न्यायाचे राज्य निर्माण केले. चंद्र-सूर्य असेपर्यंत अहिल्यादेवींचे नाव घेतच राहू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.सांगलीतील संजयनगर परिसरात महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी अध्यक्षस्थानी पालकमंत्री चंद्रकांत पाटील होते.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मध्ययुगात छत्रपती शिवाजी महाराज, लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांचा राज्यकारभार आदर्श होता. लोकशाही, समता व न्यायाची मूल्ये त्यांच्या प्रशासनात दिसतात. त्यांनी २८ वर्षे शौर्याने, न्यायप्रियतेने राज्यकारभार केला. मुघलांनी आक्रमण करून अनेक मंदिरे उद्ध्वस्त केली. रामंदिर, काशी विश्वेश्वरासह अनेक पुण्यस्थळांचे जीर्णोद्धार करण्याचे काम अहिल्यादेवी यांनी केले. जगन्नाथ पुरी मंदिराच्या विकासातही त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यांनी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी राज्याची तिजोरी न वापरता स्वत:च्या वैयक्तिक संपत्तीतून काम केले. राज्याचा पैसा जनतेच्या कल्याणासाठी वापरला. अहिल्यादेवींनी विधवा महिलांना संपत्ती, शिक्षणाचा अधिकार दिला. त्यांना रोजगार उपलब्ध करून दिले. माहेश्वर येथे साडी विणकाम उद्योग उभारून रोजगारनिर्मिती केली. आज तेथील साड्या भारताबाहेरही निर्यात होत आहेत. माळवा प्रांतात त्यांनी सतरा प्रकारचे कारखाने उभारले. दरोडेखोर, लुटारूंविरोधात आदिवासींना एकत्र करून सेैन्य उभे केले. महिला सैन्याची तुकडी निर्माण केली. ग्रामस्तरावर न्यायालये उभारून गोरगरिबांना न्याय दिला. त्यामुळे त्या खऱ्या अर्थाने लोकमाता ठरल्या.

चौंडीला प्रेरणास्थळ म्हणून विकसित केले जाणारफडणवीस म्हणाले की, अहिल्यादेवींची जन्मभूमी या चौंडीचा विकास आराखडा तयार केला आहे. चौंडीला राष्ट्रीय पातळीवरील प्रेरणास्थळ म्हणून विकसित केले जाणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी दाखविलेला मार्ग, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखविलेला संविधानाच्या मार्गानेच चालत राहू, अशा प्रकारचा संकल्प करतो.

राजकीय विरोधक एकाच व्यासपीठावरअहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळा लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने खासदार विशाल पाटील, माजी मंत्री जयंत पाटील, सुधीर गाडगीळ, विश्वजित कदम, गोपीचंद पडळकर यांच्यासह जिल्ह्यातील राजकीय विरोधक बऱ्याच दिवसांनंतर एका व्यासपीठावर आले होते. यावेळी आमदार जयंत पाटील, आमदार इद्रीस नायकवडी व पद्माकर जगदाळे यांची भेट चर्चेचा विषय ठरली.

English
हिंदी सारांश
Web Title : Ahilyadevi revived Indian culture: Devendra Fadnavis at statue unveiling.

Web Summary : Fadnavis hailed Ahilyadevi Holkar for rebuilding temples destroyed after Mughal invasions, establishing a just and equitable kingdom. He inaugurated her statue in Sangli, promising development for her birthplace, Chondi. Political rivals shared the stage at the event.